आला अंगावर घेतलं शिंगावर...गायीला लाथ मारणं पडलं महागात, असा शिकवला धडा! पाहा Video

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 14, 2022, 06:14 PM IST
आला अंगावर घेतलं शिंगावर...गायीला लाथ मारणं पडलं महागात, असा शिकवला धडा! पाहा Video title=

मुंबई : भारतात गायींना पवित्र मानलं जातं आणि त्यांची पूजाही केली जाते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत आणि त्यांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दोन व्यक्ती गाईला त्रास देताना दिसत आहे. 

हेही वाचा : वडिलांसाठी काही पण, बाप-लेकाचा हा Video नेटकऱ्यांचं जिंकतंय मन

हा व्हायरल झालेला व्हिडिओ 'घर के कलेश' या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस लांब उभा राहून बांधलेल्या गाईची दोरी ओढत आहे आणि नंतर गाय जागेवरून हलत नसल्याने तिला लाथ मारताना दिसत आहे. गाईला जोरात लाथ मारल्यानंतर, ती गाय आक्रमकपणे त्या माणसाच्या अंगावर धावते. 

हेही वाचा : जपानमधील टॉयलेट जगात भारी! पाण्याचा असा करतात वापर

हेही वाचा : बाबो! चार मुलांची आई पडली प्रेमात, पतीला समजल्यावर त्याने..., प्रत्येकानं केलं कौतुक!

जेव्हा त्या माणसाने लाथ मारली आणि नंतर शेपूट हलवायला सुरुवात केली तेव्हा गाय खूप चिडली. गाय त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत राहिली, परंतु जेव्हा तो माणूस त्या गाईला त्रास देत राहिला तेव्हा तिनं संतापून त्या माणसावर हल्ला केला. गाय माणसाकडे धावताना दिसते तर ती व्यक्ती दोरीनं गाईवर नियंत्रण ठेवू शकत नाही, हे दिसून येते. गाय मग रागाच्या भरात त्या माणसाला लाथ मारते, जो खाली पडतो. 

हेही वाचा : मनाचा मोठेपणा दाखवत सुपरस्टार बाप- लेकानं परत केलं कोट्यवधींचं मानधन, कारण पटण्याजोगं...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. संतप्त नेटकऱ्यांनी या व्यक्ती सोबत बरोबर झालं असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यानं गाईला मारलं कारण त्यानं गौ मातेला मारलं. आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही जसे कराल, तसं तुमच्यासोबत होईल.'