वडिलांसाठी काही पण, बाप-लेकाचा हा Video नेटकऱ्यांचं जिंकतंय मन

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Oct 14, 2022, 05:42 PM IST
वडिलांसाठी काही पण, बाप-लेकाचा हा Video नेटकऱ्यांचं जिंकतंय मन title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपण खूप हसतो तर काही व्हिडीओ पाहून आपण इमोश्नल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या दिवशी जी भेटवस्तू देतो ते पाहून सगळे भावूक होतात.

हेही वाचा : जपानमधील टॉयलेट जगात भारी! पाण्याचा असा करतात वापर

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक मुलगा त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्यासाठी केक घेऊन येतो आणि स्वत: च्या मुलाला पाहताच ते भावूक होतात. खरंतर, हा मुलगा त्याच्या वडिलांच्या वाढदिवसासाठी कॅनडावरून भारतात येतो. मुलाला अचानक वाढदिवसाच्या दिवशी समोर पाहिल्यानंतर ते भावूक होतात. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. (Son Surprise His Father On Birthday Get Emotional Video Viral) 

हेही वाचा : बाबो! चार मुलांची आई पडली प्रेमात, पतीला समजल्यावर त्याने..., प्रत्येकानं केलं कौतुक!

हेही वाचा : मनाचा मोठेपणा दाखवत सुपरस्टार बाप- लेकानं परत केलं कोट्यवधींचं मानधन, कारण पटण्याजोगं...

हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 18 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आम्ही भावूक झालो असं म्हणत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी आम्ही हे अनुभवलं आहे. आमची ही मुलं काही कामा निमित्त किंवा मग अभ्यासानिमित्त बाहेर गेले आहेत, असं देखील अनेकांच म्हणणं आहे.