शिकाऱ्याचीच झाली शिकार? सिंहिणीनं घेतला चुकीच्या प्राण्याशी पंगा... पाहा व्हिडीओ

वन्यजीवनात रस असलेले छायाचित्रकार एक परिपूर्ण क्लिक मिळवण्यासाठी जंगलात तास घालवतात.

Updated: Oct 17, 2021, 07:42 PM IST
शिकाऱ्याचीच झाली शिकार? सिंहिणीनं घेतला चुकीच्या प्राण्याशी पंगा... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : वन्य प्राण्यांशी संबंधित मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर आपल्याला व्हायरल होत आहेत. जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना मोठ्या आवडीने पाहायला आवडते. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा अशाप्रकारचा कोणताही व्हिडीओ किंवा कंटेन्ट शेअर केला की लोकं त्याला आवडीने पाहातात आणि एकमेकांना शेअर करतात. ज्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होतात.

वन्यजीवनात रस असलेले छायाचित्रकार एक परिपूर्ण क्लिक मिळवण्यासाठी जंगलात तास घालवतात. ज्यामुळे ते त्यांच्या कॅमेरात जंगलातील अनेक गोष्टी कैद करतात आणि आपल्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर शेअर करतात.

सध्या, एक हिप्पोपोटॅमस म्हणजेच पाणगेंडा आणि सिंहिणी यांच्यात झालेल्या मारामारीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

असे म्हटले जाते की सिंहाशी सामोरं जाणे आणि त्याच्यासोबत झुंज देणे म्हणजे आपल्या मृत्यूला आमंत्रण करणे. त्यामुळे जंगलात क्वचितच असा एखादा प्राणी असेल, जो या भयावह प्राण्याला थेट आव्हान देण्याचे धाडस करेल. परंतु या व्हिडीओमध्ये सिंहिनीला पाणगेंडा झुंज देताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका सिंहीण शेतात हिप्पोपोटॅमसला एकटं पाहून त्याच्यावर हल्ला करते. परंतु तिला ही कल्पना नव्हती की, तो तिच्यावरती पलटवार करेल. ज्यामुळे तिला त्याची शिकार करण्यात अडथळा निर्माण होईल. त्यानंतर सिंहिणीला हे कळून चूकलं की, तिने चुकीच्या प्राण्याशी पंगा घेतला आहे, ज्यामुळे आता तिच्याच जिवाला याच्यापासून धोका आहे. ज्यामुळे सिंहिण तेथून पळून जाऊ लागते. परंतु पाणगेंडा मात्र आता तिला सोडायला तयार नसतो.

पाणगेंडा त्या सिंहिणीचे डोके त्याच्या मोठ्या जबड्यात दाबून तिला जमिनीवर आपटतो. पुढे या सिंहिणीचं काय होतं हे काही व्हिडीओत दाखवले गेले नाही. परंतु एवढं मात्र नक्की की जर या सिंहिणाचा जिव वाचला असला तर ती आयुष्या आपण केलेल्या चुकीवरती पश्चाताप करेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रकृति 27_12 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांना खूप आवडत आहे.

एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 53 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर, लोक यावर सतत आपला अभिप्रायही देत ​​आहेत. बहुतेक वापरकर्ते इमोटिकॉन्सद्वारे व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.