नवरीच्या चुकीला माफी नाही? एवढा 'बिचारा नवरदेव' तुम्ही कधीच पाहिला नसेल

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू आणि वर प्रत्येक लग्न झालेल्या नवीन जोडप्यांसारखे थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेत असतात.

Updated: Jun 29, 2021, 07:41 PM IST
नवरीच्या चुकीला माफी नाही? एवढा 'बिचारा नवरदेव' तुम्ही कधीच पाहिला नसेल title=

मुंबई : आजकाल लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यांमुळे आपण जिकजे पाहू तिकडे जो तो लग्न करताना दिसतोय. लग्नातील चांगले वाईट क्षण सगळ्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जातात. त्यात काही लग्नातले असे काही, किस्से असतात जे कधी ही न विसरणारे असतात. त्यात लग्नातले काही असे क्षण असतात जे सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या चेहऱ्य़ावरील हसू रोखू शकणार नाही.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू आणि वर प्रत्येक लग्न झालेल्या नवीन जोडप्यांसारखे थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेत असतात. त्यावेळेस नवरी असे काही करते की, नवऱ्याची लूंगीच सुटते आणि नवऱ्याला उपस्थित सगळ्या मंडळींसमोक नग्न व्हायची वेळ येते.

खरे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी नवऱ्याच्या उजवीकडे असलेली वधू आपल्या बहिणीला मिठी मारण्यासाठी नवऱ्याच्या डाव्या बाजूला जाते. परंतु वधूची साडी आणि वराची लुंगी बांधलेली असल्याने, नवरी फिरताच नवऱ्याची लुंगी वर होते आणि ती सुटते. ही संपूर्ण घटना एका कॅमेर्‍यासमोर रेकॉर्ड केली गेली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यामध्ये नवर देव आपली इज्जत आणि लूंगी वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतो. परंतु त्याचा काही एक फायदा होत नाही आणि शेवटी नवरदेवाचे हसूच होते. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलेल्यानंतर 54 हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हिडीओला शेअर केले आहे.