पाण्यात मस्ती करत होती मुलगी, पुढच्याच क्षणी घडला अपघात; पाहा व्हिडिओ

सध्या असाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Dec 28, 2021, 05:08 PM IST
पाण्यात मस्ती करत होती मुलगी, पुढच्याच क्षणी घडला अपघात; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी कोणते व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील हे सांगणं फार कठीण आहे. यामधील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण ठेवतात. आपण असे व्हिडीओ आवडीने पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील ते शेअर करतो. सोशल मीडिया हे असं जग आहे, जेथे आपल्याला सर्वप्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात काही लोकं प्रसिद्धीसाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी असे काही व्हिडीओ टाकत असताता जे लोकांचे मनोरंजन करेल.

सध्या असाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीचा हा पावसात भिजताना आणि साचलेल्या पाण्यात नाचतानाचा हा व्हिडीओ आहे.

अनेक लोकांना पावसात भिजायला फार आवडते. लोकं पावसात भिजतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. पावसात भिजताना लोकं नाचतात, गातात आणि आपला आनंद व्यक्त करतात. असंच काहीसं या व्हिडीओमधील मुलगी करत होती. परंतु असं करणं तिला भलतंच महागात पडलं आहे. जे पाहून तुम्हाला तुमचं हसु आवरणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी साचलेल्या पाण्यात चालत आहे आणि आपला आनंद व्यक्त करत आहे. ती त्या पाण्यात गोल फिरते आणि आपल्याच विश्वात हरवलेली असते. त्यानंतर ती पोज द्यायला जाते आणि साचलेल्या पाण्याच्या थोड्या पुढच्या भागात पाय ठेवायला जाते आणि पाण्यात पडते. तिची ती अवस्था पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल. अगदी 6 सेकंदाचा हा व्हिडिओ सर्वांनाच आवडला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, बऱ्याच लोकांनी या व्हिडीओ शेअर देखील केलं आहे. तर अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने कमेंट करत लिहिले,  या मुलीसोबत खूप वाईट घडले आहे. आणखी एका युजरने लिहिले - मला खात्री आहे की, या मुलीला ते खूप आवडले असेल. तिसऱ्या यूजरने लिहिले - हा खुपच मजेदार क्षण होता.