Paytm Cashback | मोबाईल रिचार्जवर Paytm चा १००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक

अलीकडे, Jio, Airtel आणि Vodafone Idea ने प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या.

Updated: Dec 28, 2021, 04:28 PM IST
Paytm Cashback | मोबाईल रिचार्जवर Paytm चा १००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक title=

मुंबई : अलीकडे, Jio, Airtel आणि Vodafone Idea ने प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर रिचार्ज प्लॅनसाठी वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागतेय. (Airtel Tariff Hike) मोबाईल वॉलेट अॅप Paytm ने रिचार्ज करणाऱ्यांना दिलासा दिला आहे.

(Vodafone Idea Tariff Hike)जर तुम्हाला रिचार्ज प्लॅन महाग वाटत असेल. तसेच तो कमी व्हावा असे वाटत असेल तर पेटीएमने रिचार्ज करून तुम्हाला जबरदस्त कॅशबॅक मिळवू शकता. Paytm ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत (Jio Prepaid Plan) तुम्हाला रिचार्जवर रु. 1,000 पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

Paytmची कॅशबॅक ऑफर

जर तुम्ही तुमचा मोबाईलला Paytmने रिचार्ज केला. तर तुम्हाला उत्तम कॅशबॅकचा लाभ मिळेल. तुम्ही पहिल्यांदा पेटीएमने रिचार्ज करत असाल तर FLAT15 प्रोमोकोड वापरा.

या प्रोमोकोडचा लाभ घेतल्यास तुम्हाला रु. 15 ची सवलत मिळेल. एवढेच नाही तर तुम्ही WIN1000 प्रोमोकोड वापरल्यास, तुम्ही रु.1,000 पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

पेटीएमचा हा कॅशबॅक ऑफरचा लाभ जवळपास सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्जवर घेता येतो. म्हणजेच ही ऑफर Jio, BSNL, Airtel आणि Vodafone Idea च्या सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

पेटीएमवर इतर अनेक सुविधा उपलब्ध

मोबाईल रिचार्जसोबतच यूजर्सना पेटीएमवर इतरही अनेक सुविधा मिळतात. येथे तुम्हाला गॅस सिलेंडर बुकिंगपासून क्रेडिट कार्ड पेमेंटपर्यंत अनेक पर्याय मिळतात.