हॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर!

Viral Video OF Fish:फाईव्ह स्टार हॉटेलचा (five star hotel) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे. 

Updated: Feb 16, 2023, 05:08 PM IST
हॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर! title=
Viral Video Fish

Shocking Viral Video On Internet : सोशल मीडिया (Social Media Viral Video) म्हणजे व्हायरल व्हिडिओची खाण.. अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पहायला मिळतात. त्यातील काही व्हिडिओ मनाला सुखदायक असतात. तर काही व्हिडिओ हादरवून (Shocking Video) सोडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (trending) होताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसतंय? 

फाईव्ह स्टार हॉटेलचा (five star hotel) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे, ज्यामध्ये आपण टेबलवर एक खास डिश सर्व्ह (Fish dish) झालेली पाहू शकतो. डिश पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. ताटात दोन माशांसोबत सॅलडही (Salad) दिसत आहे. सुरुवातीला सर्व काही ठीक दिसतंय. पण अचानक असं काही घडलं की... तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

आणखी वाचा - Lions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...

एक माणूस माशाच्या तोंडाजवळ चॉस्पस्टिक (chopstick) घेतो, त्यावेळी मासा तो अचानक जिवंत होतो आणि चॉपस्टिकला दातांमध्ये दाबतो, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ 13 फेब्रुवारी रोजी ट्विटर शेअर करण्यात आला आहे. मला मासे सर्व्ह केले गेले अन् माशाने माझी चॉपस्टिक्स (chopstick Fish) पकडली, असं हॉटेलच्या ग्राहकाने सांगितलं आहे.

पाहा Video - 

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार करा, असे सल्ले नेटकरी देताना दिसत आहेत. तर काहींनी ही आरोग्यासाठी हाणीकारक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ व्हॉट्स अॅप (whats app) युनिव्हर्ससिटीवर देखील व्हायरल होताना दिसत आहे.