बापाने मनातलं ओळखलं! बर्थडे गिफ्ट पाहून चिमुकला बिलगून रडला, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Viral Video : आनंद किती लहान गोष्टींमध्ये असतो... नाही का? हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच आठवले बालपणीचे दिवस. जेव्हा एका गोष्टीसाठी कैक दिवस वाट पाहावी लागत होती...   

सायली पाटील | Updated: Oct 23, 2024, 02:00 PM IST
बापाने मनातलं ओळखलं! बर्थडे गिफ्ट पाहून चिमुकला बिलगून रडला, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी title=
viral video Boy Receives Cricket Kit As Birthday Gift His Reaction makes Internet cry watch

Viral Video : इन्स्टाग्रामवर Reel पाहत असताना अनेकदा व्हिडीओ न पाहता स्क्रोल केले जातात. पण, सध्या मात्र एक असा Reel/ व्हिडीओ या माध्यमातून व्हायरल होत आहे, जो वारंवार पाहिला जात आहे. एकमेकांना शेअरही केला जात आहे. हा व्हिडीओ पाहताना अनेकांनाच त्यांचं बालपणही आठवत आहे. 

लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी आई- वडिलांकडे कितीही हट्ट केला तरीही त्यांना शक्य होईल आणि आपल्याला अमुक एक गोष्ट देण्याची योग्य वेळ असेल तेव्हाच ती गोष्ट मिळायची. अगदी तसाच काहीसा प्रसंग एका लहान मुलाच्या बाबतीत घडला. व्हिडीओ पाहता, त्याच्या भावनांनी त्याच्या मनातलं बरंच वक्त केलं. 

Viral Video मध्ये आहे तरी काय? 

स्वप्न सत्यात उतरणं म्हणजे काय, हे या मुलाचा चेहरा पाहून लक्षात येत आहगे. almsports01 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा क्रिकेटच्या सरावावरून घरी परतल्याचं दिसत आहे. घरात पाय ठेवताच त्याच्यासमोर एका कापडानं झाकलेली वस्तू येते आणि ती पाहताक्षणी त्याचा उत्साह गगनात मावेनासा होतो. 

हा मुलगा पुढे येऊन ज्या क्षणी ते कापड बाजूला सारतो तेव्हा हे सरप्राईज पाहून त्याच्या डोळ्यात पाणीच येतं आणि आनंदाच्या भरात हा मुलगा त्याच्या बहिणीला घट्ट मिठी मारतो. उत्साह, प्रतीक्षा, आनंद, कृतज्ञता अशा अनेक भावना अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये अधोरेखित होताना दिसतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अनेकांनी पाहत आपल्या बालपणीचे दिवस आठवले. 

हेसुद्धा वाचा : दिवसाचं भाडं 1.5 लाख, तरीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटात राहिली पुणेकर महिला, वापरली 'ही' भन्नाट शक्कल

आनंद हा अगदी लहानसहान गोष्टींमध्ये असतो आणि त्यामागे कैक प्रयत्नही असतात. आधुनिक काळात मात्र वस्तूनिष्ठ तत्वांच्या मागं धावताना हाच आनंद मात्र कुठेतरी हरवून जातो, याचीच जाणीव आणि स्मरण अनेकांना झालं. काही नेटकऱ्यांनी 'आपण मोठे झालो असलो तरी, या गोष्टी मात्र मागेच पडल्या' असं म्हणत या व्हिडीओला पसंती दिली.