Viral Video: शॉर्टकट मारत रेल्वे ट्रॅक पार करत होता दुचाकीस्वार, तितक्यात वेगात आली ट्रेन आणि...

थोडासा वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, वेगात येणाऱ्या ट्रेनआधी रेल्वे रुळ पार करण्याचं धाडस अंगाशी आलं

Updated: Feb 15, 2023, 01:36 PM IST
Viral Video: शॉर्टकट मारत रेल्वे ट्रॅक पार करत होता दुचाकीस्वार, तितक्यात वेगात आली ट्रेन आणि...  title=

Viral Video : काही सेकंद वाचवण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात टाकून शॉर्टकट (shortcut) मारण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकवेळी शॉर्टकट फायदेशीर ठरतातच असं नाही. रेल्वे फाटक (Railway Gate) बंद असतानाही अनेक जण लवकर जाण्याच्या घाईत रेल्वे रुळ पार करताना दिसतात. पण नसता धोका अनेकवेळा जीवावर बेततो. सध्या असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक दुचाकीस्वार (Bike Rider) रेल्वे येत असतानाही रेल्वे रुळ ओलांडण्याची चूक करतो. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
शॉर्टकट मारत हा दुचाकीस्वार रेल्वे फाटकखालून दुचाकी घेऊन रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतो. जसा तो रेल्वे रुळापर्यंत पोहोचतो, त्याचवेळी वेगाने रेल्वे येतो. पुढे जे घडतं ते पाहून अंगावर शहारे येतील. हा व्हिडिओ  @wpeoplesurvive या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 62 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. त्याचबरोबर 1300 पेक्षा जास्त लाईक आणि 100 पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. 

फाटक बंद असतानाही धोका पत्करला
रेल्वे फाटक बंद असतानाही अनेकजण रेल्वे रुळ ओलांडण्याची चूक करतात. अनेक जण बंद फाटकच्या खालून रेल्वे रुळ ओलांडण्याची घाई करतात. यामुळे अनेकवेळा मोठे अपघात होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतही हा दुचाकीस्वार रुळ ओलांडण्याची चूक करताना दिसतोय. रेल्वे येणार असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आलं. 

पण अनेक जण फाटकाखालून रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. यात हा बाईकस्वारही आहे. घाईघाईत तो फाटकाखालून रेल्वे रुळापर्यंत पोहोचला. त्याचवेळी वेगाने रेल्वे येताना दिसतेय. रेल्वे येण्याची आणि दुचाकीस्वार रुळावर पोहोचण्याची एकच वेळ होते, प्रसंगावधन दाखवत चालक दुचाकीवरुन उडी मारत आपला जीव वाचवतो. पण रेल्वेच्या धडकेत दुचाकीच्या चिंधड्या होतात. दुचाकीवरुन उडी मारल्याने चालकाला मुका मार बसला, या व्हिडिओत तो लंगडताना दिसतोय. 

त्यामुळे थोडासा वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू नका असं आवाहन वारंवार केलं जातं.