Andhra Professor: 93 वर्षांच्या वयोवृद्ध शिक्षिका दररोज 60 किलोमीटर प्रवास का करतायत?

World Oldest Teacher: आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिक्षिकेबद्दल (Teacher Who Taught Students at the Age of 93) सांगणार आहोत ज्या वयाच्या 93 व्या वर्षाही असं काम करतायेत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि त्याचसोबत त्यांच्या जिद्दीला पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Feb 15, 2023, 01:34 PM IST
Andhra Professor: 93 वर्षांच्या वयोवृद्ध शिक्षिका दररोज 60 किलोमीटर प्रवास का करतायत?  title=

World Oldest Teacher: आता खूप काम केलं... वयाची 60 आली आता रिटायर्ड (Retirement) होण्याची वेळ आली आहे, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकलं असेलच. परंतु अशीही अनेक लोकं आहेत. ज्यांची धडाडी आणि जिद्द पाहून तुम्हा त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सध्याच्या अनेक लोकांची अशी मानसिकता झाली आहे की आपण 60 नंतर खूपच स्टेबल म्हणजे शांत आणि निरोगी आयुष्याच जगायचे असते त्यासाठी आपण अनेकदा कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन आपलं उर्वरित आयुष्य व्यथित करतो परंतु काही जणं असेही आहेत ज्यांना शांत आणि सुदृढ आयुष्य हवे असतेच परंतु त्याचसोबतच ते असं काहीतरी आयुष्यात करायचा प्रयत्न करतात ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. (Andhra Professor santhamaa who is 93 years old and travels 60 kilometer long to teach students at university)

आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिक्षिकेबद्दल (93 year old teacher) सांगणार आहोत ज्या वयाच्या 93 व्या वर्षाही असं काम करतायेत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि त्याचसोबत त्यांच्या जिद्दीला पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. या शिक्षिका वयाच्या 93 वर्षी विजाग ते विजयनगरमपर्यंत 60 किलोमीटरचा प्रवास करतात. या शिक्षिका आंध्र येथील सेंचुरियन विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा विषय शिकवतात. त्यांचे नाव आहे संथम्मा. ज्यांना प्रोफेसर संथम्मा म्हणूनही जास्त ओळखले जाते. त्यांची आई वनजक्षम्मा 104 वर्षे जगल्या होत्या. त्यामुळे जगातील सर्वात वयस्कर शिक्षिका म्हणून त्या नावाजल्या गेल्या आहेत. 

प्रोफेसर म्हटल्यावर त्यांचे शिक्षण हे तगडे असेलच. तेव्हा त्यांनी बी.एससी ऑनर्स आणि माईक्रोवेव स्पेक्ट्रोस्कोपी मधून डी.एससीची पदवी घेतली आहे. त्यांच्याबद्दल लिहावे तेवढेच कमी आहे परंतु त्या स्वत: मुलांना शिकविण्यासाठी 60 किलोमीटरचा प्रवास करतात तेही वयाच्या 93 वर्षी. त्यामुळे त्यांनी रिटार्डमेंट तर घेतली नाहीच परंतु त्यांच्या शिक्षणाची आणि करिअरची बायोग्राफी वाचून तुम्हीही थक्क होऊन जाल. 

जाणून घ्या संथम्मा यांची बायोग्राफी 

प्रोफेसर संथम्मा यांनी मोठ-मोठ्या पदावरून कामही केले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक विविध विभागांमधून लेक्चररशिप म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याचसोबतच प्रोफेसर आणि रीडर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहेच सोबतच इन्वेस्टिगेटर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचसोबत त्यांना त्यांच्या विषयासाठी मोठमोठे सन्मानही देण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या आण्विक स्पेक्ट्रोस्कोपीच्या विश्लेषणासाठी अनेक सन्मा देण्यात आले असून त्यांना 2016 साली वेटरन सायंटिस्ट श्रेणीतून सुवर्णपदकही मिळाले आहे. भगवद्गीता - द डिव्हाईन डायरेक्टिव नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.