viral video: अमिताभ-रेखा यांच्या गाण्यावर नर्तकीसह वृद्ध इसमाच एक नंबर Dance, पाहणारेही झाले बेभान

Old man dance viral video: हल्ली अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. त्यातून डान्सशी संबंधित काही व्हिडीओ असतील तर तेही जोरदार व्हायरल (viral) होताना आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तूफान व्हायरल होतो आहे. 

Updated: Dec 11, 2022, 12:26 PM IST
viral video: अमिताभ-रेखा यांच्या गाण्यावर नर्तकीसह वृद्ध इसमाच एक नंबर Dance, पाहणारेही झाले बेभान  title=
old man dance viral video

Old man dance viral video: हल्ली अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. त्यातून डान्सशी संबंधित काही व्हिडीओ असतील तर तेही जोरदार व्हायरल (viral) होताना आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर गृहस्थ एका आयटम नंबर डान्सरसोबत (item number) तूफान डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल (video viral old man dance) झाला असून या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही आले आहेत. (viral video an old man dances with lady dancer at an event video goes viral) 

असं म्हटलं जात की म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. या वयातील माणूस लहान मुलांसारखं वागायला लागतो, हट्ट करतो आणि या वयातही एकप्रकारे स्वैराचार हवा असतो. तर दूसरीकडे म्हातारपणी आपले अनेक अवयव कमजोर होतात आणि आपल्या शरीरातील ताकदही कमी होऊ लागते. पण काही लोकं या सगळ्यावर मात करतात आणि भल्या भल्यांना आश्चर्यचकित करून सोडतात. वय हा फक्त आकडा आहे असं या लोकांकडे पाहून वाटतं. शरीरानं म्हातारे झाले तरी मनानं तरूण राहा, हा मुद्दा येथे पुन्हा एकदा (young vs old man video) अधोरेखित होतो आहे. आणि हीच गोष्ट एका वृद्ध इसमानं सिद्ध करून दाखवली आहे. 

सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे वृद्ध इसम अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या सलाम - ए - इश्क (salam - e ishq) हे हिट गाण्यावर नाच करताना दिसत आहेत. या व्हिडीओत ते जबरदस्त एनर्जीनं डान्स पाहून नेटकरी या इसमाचे (amitabh bachchan and rekha) सोशल मीडियावर जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. कमेंट्सवरून हे लक्षात येईलच. सलाम-ए-इश्क गाण्यावर वृद्ध व्यक्तीच्या डान्सचा व्हिडिओ एका यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'परफॉर्मन्स' हा शब्द. 

अमिताभ-रेखा यांच्या हिट गाण्यावर जबर डान्स

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओ (trending dance video) तूम्ही पाहू शकता की एक डान्सर सलाम - ए - इश्क या गाण्यावर डान्स करताना दिसते त्यानंतर हे वृद्ध इसम त्या डान्सरसोबत डान्स करायला येतात. कधी आडवे पडतात तर कधी स्टेजवरच कोसळतात. तिचा डान्स पाहून ते उत्तेजित होतात आणि तेही नाचू लागतात. जमलेले लोकं त्या डान्सरेपक्षा वृद्ध इसमाकडेच पाहू लागले. नेटिझन्सनाही हा डान्स पसंतीस पडला. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर हा डान्स करतानाचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. याशिवाय या व्हायरल व्हिडिओला 1 लाख 43 हजारांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. या डान्सवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, व्हा, क्या जवानी हैं, उसे छोडने का नामही नहीं ले रहे...चलने दो!