Video: आ गया कुल्फी वाला आ गया! अंगावर करोडोंचं सोनं घालणाऱ्या कुल्फीवाल्याची सोशल मीडियावर हवा

Viral Video of Golden Man: तुम्ही लोकांच्या अंगावर महागडे सोने घालताना पाहिले असेलच. आता तुम्हाला असाच एक इसम इंदौरच्या (indore sarafa Bajar) सराफा बाजारातही भेटले. होय, त्यांचे नाव आहे बंटी यादव.

Updated: Dec 16, 2022, 10:16 PM IST
Video: आ गया कुल्फी वाला आ गया! अंगावर करोडोंचं सोनं घालणाऱ्या कुल्फीवाल्याची सोशल मीडियावर हवा title=
golden man news

Viral Video of Golden Man: तुम्ही लोकांच्या अंगावर महागडे सोने घालताना पाहिले असेलच. आता तुम्हाला असाच एक इसम इंदौरच्या (indore sarafa Bajar) सराफा बाजारातही भेटले. होय, त्यांचे नाव आहे बंटी यादव. ते इंदौरच्या सराफा बाजारात सोन्याची वर्ख असलेली चक्क 350 रूपयांची कुल्फी विकतात. त्यांच्याकडे केशर, पिस्ता, मॅंगो असा अनेक फ्लेवरच्या कुल्फ्या मिळतात आणि लोकं त्यांच्याकडे आवर्जून कुल्फीची चव चाखायला येतात. एवढंच नाही तर सोबतच ते आपल्या शरीरावर करोडो रूपयांचे सोनंदेखील घालतात. चला तर मग जाणून घेऊया या सर्वात महागड्या कुल्फी (kulfi) विक्रेत्यांबद्दल. (viral video a man from indore serves golden kulfi to the foodie people and also wears gold worth of 1 crore)

यांचे नाव आहे बंटी यादव (Bunty Yadav). त्यातून त्यांची ही महागडी कुल्फी सर्वत्र फेमस आहे. हा सराफा बाजार नाईट लाईफसाठी इंदौरमध्ये ओळखला जातो आणि हे बंटी यादव सर्व तिथे येणाऱ्या खवय्यांना चांगलीत कुल्फीची ट्रीट देत असतात. हिवाळा असो वा पावसाळा, वा उन्हाळा, तुम्ही इंदौरला गेलात तर सर्वच सिझनमध्ये तुम्हाला ही स्पेशल सोन्याची कुल्फी चाखायला मिळेल. 

लोकं बंटी यांना ग्लोडन मॅन म्हणून हाक मारतात. प्रकाश फालूदा कुल्फी या नावानं त्याचं दुकान आहे आणि ते दोन-तीन दिवस सलग तरी करोडो रूपयांचे सोनं अंगावर घालतात. त्यामुळे त्यांची सगळीकडेच चर्चा असते. बंटी यादव यांचे आजोबा किशोर लाल यादव यांनी 1965 साली प्रकाश फालूदा कुल्फी नावाचा हा स्टॉल सुरू केला त्यानंतर बंटी यांचे वडील रामचंद्र यादव यांनी या दुकानाचा पुढे सांभाळ केला. आता त्यांची तिसरी पिढी म्हणजे बंटी यादव 2000 पासून त्यांचा हा व्यवसाय सांभाळत आहेत. बंटी यांचा परिवारही त्यांना त्यांच्या कामात मदत करतो. 

अशी आली आयडिया- 

बंटी सांगतात की ते त्यांच्या वडिलांसोबत या कामात आले त्यानंतर त्यांना आपला या उद्योग वेगळ्या प्रकारे चालवण्याची आयडिया आली. त्यांनी आपल्या अंगावर आणि बोटात महागडं सोनं घालायला सुरूवात केली तेव्हा अनेकजणं त्यांच्या या सोनं घालण्यावर चर्चा करू लागले. तर काहींना ते घालतात ते सोनं खरंच खरं आहे का यावरही प्रश्न उपस्थित केले मग त्यावरून त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी त्यानंतर सोन्याची वर्ख असलेली महागडी कुल्फी विकायला सुरूवात केली. ते म्हणतात की ही कुल्फी खाल्यानं आरोग्यदायी फायदेही होतात.