Fact Check | समुद्रात भयानक लाटा, ढगांना भिडली लाट?

सोशल मीडियावर व्हायरल होणारे सर्वच व्हीडिओ हे काही खरे नसतात. मात्र काही एडिटेड व्हीडिओ अशा प्रकारे एडिट केलेले असतात, की ते खरेखुरे वाटतात.  

Updated: May 6, 2022, 10:56 PM IST
Fact Check | समुद्रात भयानक लाटा, ढगांना भिडली लाट? title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणारे सर्वच व्हीडिओ हे काही खरे नसतात. मात्र काही एडिटेड व्हीडिओ अशा प्रकारे एडिट केलेले असतात, की ते खरेखुरे वाटतात. त्यामुळे अनेकांची फसवणूक होते. असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  (viral polkhol fact check sea high wave touch to sky know what false what truth)

समुद्रातील लाटांचा भयानक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत चक्क समुद्रातील लाटा ढगांना भिडत असल्याचं दिसतंय. हा एकूण37 सेकंदाचा  हा व्हीडिओ आहे. व्हीडिओ पाहून अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पण, खरंच एवढी उंच लाट असू शकते का...? 

ही लाट आहे की कुणी घाबरवण्याचा हा प्रयत्न केलाय, असे अनेक सवाल उपस्थित होतायत. पण, अशी लाट ढगांना लागली असती तर मोठी हाणी झाली असती. हा व्हिडिओ स्लो मोशन केला असून, लाट आकाशाला भिडत असल्याचं दाखवण्यात आलंय.