मुंबई : निसर्ग अनंत रहस्यांनी भरला आहे. प्रत्येक जीव स्वतःमध्ये काहीतरी विशेष जपत असतो. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी सर्वात खतरनाक साप किंग कोब्राचा एक फोटो सोशलमीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये एक किंग कोब्रा दुसऱ्या कोबाला खात आहे. जगातील सर्वात खतरनाक साप जगातील दुसऱ्या खतरनाक सापाला खात आहे.
भारतीय वन अधिकारी परवीन कासवान यांनी हा फोटो आपल्या ट्वीटर हॅडलवर पोस्ट केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक किंग कोब्रा दुसऱ्या कोब्राला गिळत आहे. या फोटोकडे पाहून लोकं भांबवले आहेत.
Ophiophagus hannah. A king cobra eating a spectacled cobra. They feed on lesser mortals. pic.twitter.com/LL8xzQoIww
— Parveen Kaswan (@ParveenKaswan) July 19, 2021
किंग कोब्राचे वैज्ञानिक नाव Ophiophagus hannah आहे. हे नाव ग्रीक भाषेतील आहे.
किंग कोब्रा साप नेहमी काही ना काही खात असतो. शरीराचे आकारमान मोठे असल्याने किंग कोब्रा कायम शिकारीच्या भूमिकेत असतो. उंदीर या सापाचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे उंदीर खाणारे साप देखील किंग कोब्रा खातो.
परवीन कासवान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये किंग कोब्राचे डोळे प्रचंड भीतीदायक असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.