दोन मुलांच्या आईचे मित्रावर प्रेम जडले, प्रियकर भेटायला आला अन् तितक्यात...

Viral News: एका महिलेचे तिच्याच मित्रावर प्रेम जडले. दोघे लपत -छपत भेटत होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले अन्... 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 1, 2023, 04:00 PM IST
दोन मुलांच्या आईचे मित्रावर प्रेम जडले, प्रियकर भेटायला आला अन् तितक्यात...   title=
viral news woman marries her long time bf in front of villagers

Love Affair News In Marathi:  दोन मुलांची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात पडला तरुण. दोघंही लपतछपत एकमेकांना भेटत होते. मात्र, त्याचदरम्यान घडलं कसं काही की दोघांनाही चांगलाच धक्का बसला आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी गावातील मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. यावेळी गावकऱ्यांनी हरहर महादेवच्या जयघोषात दोघांचे लग्न लावले आहे. मध्यप्रदेशातील छपरा जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Extra Marital Affair News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम देवी असं महिलेचे नाव आहे. तिचा पती गावातच मजुरी करतो. पती गावात नसताना तिची बाजूच्या गावातील उपेंद्र कुमारसोबत ओळख झाली. आजूबाजूच्या गावातील असल्यामुळं दोघांमध्ये मैत्री झाली. हळहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सोनमला पहिल्या पतीपासून दोन मुलं आहेत. तरीदेखील तिचे उपेंद्रसोबत सूत जुळले. दोघंही एकमेकांना लपत-छपत भेटत होते. 

सोमनचा प्रियकर उपेंद्र हा अविवाहित आहे. त्याला भेटण्यासाठी सोनम तिच्या माहेरी जात असे. त्यानंतर माहेरच्या गावापासून जवळच असलेल्या एका बाजारात ते भेटत असत. मात्र, एक दिवस दोघांनाही तरुणाच्या नातेवाईकांनी रंगेहात पकडले. सुरुवातीला युवकाच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. मात्र, तरीही युवक तिच्यासोबतच लग्न करण्याच्या हट्टावर अडून होता. 

गावकऱ्यांनी हे प्रकरण पंचायतीसमोर आणले. त्यानंतर गावच्या मुख्य व्यक्तींनी दोघांनाही समोर आणून उभे केले. पंचायतींनी या दोघांचेही लग्न लावून देण्यास सांगितले. पूर्ण गावासमोरच दोघांचे लग्न लावण्यात आले. महादेव मंदिरात हे लग्न करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी हर हर महादेवचा जयघोषही केला आहे. या जोडप्याचे लग्न गावातील मुखिया राजेष राय, सुनील कुमार राम, सरपंच राजेश शर्मा, विकासमंत्री वीरेंद्र राम आणि गावकऱ्यांसमोर लावून देण्यात आलं आहे. गावच्या पंचायतीने घेतलेला हा निर्णयामुळं दोघे पती-पत्नी खुश आहेत.