याला म्हणतात नशीब! उधारीवर चाळीस रुपये घेतले, काही तासातच मजूर बनला करोडपती

Viral News : कोणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही. रोजंदारीवर काम करणारा एक मजूर एका दिवसात करोडपती बनल्याची घटना समोर आली आहे. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मजूराचं नशिब रातोरात चमकलं.

राजीव कासले | Updated: Oct 2, 2023, 05:17 PM IST
 याला म्हणतात नशीब! उधारीवर चाळीस रुपये घेतले, काही तासातच मजूर बनला करोडपती title=

Viral News : कोणाचं नशीब कधी कधी चमकेल हे सांगता येत नाही. ते म्हणतात ना, देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. अशीच हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. रोजंदारीवर काम करणारा एक मजूर (Loborer) काही तासातच करोडपती बनला. हा मजूर नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेला होता.  परतल्यावर आपण करोडपती झाल्याची माहिती त्याला मिळाली. अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घराबाहेर लोकांची रांग लागली होती. ही घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) बर्दवान जिल्ह्यातील खुरतुबापूर गावातील आहे.

 या गावात राहाणाार भास्कर माजी हा मजूर दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतो असं बकऱ्या चारण्याचं काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. भास्कर माजी हा गेल्या दहा वर्षांपासून लॉटरीचं (Lottery) तिकिट विकत घेत होता. एकदिवस आपल्याला लॉटरी लागेल आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा तो बाळगून होता. अनेकवेळा लॉटरीचं तिकिट घेण्यासाठी पैसे नसायचे. रविवारी सकाळी देखील त्याने असेच उधारीवर चाळीस रुपये घेतले आणि लॉटरीचं तिकट विकत घेतलं. त्यानंतर तो आपल्या कामावर निघून गेला. 

भस्कार माजी रविवारी गावातील नपारा बस स्टॅंडजवळ बकऱ्यांना घेऊन आला होता. बकऱ्यांना चरायाल सोडून तो बस स्टँडजवळच्या लॉटरी सेंटरमध्ये लॉटरी काढण्यासाठी आला. पण त्याच्याजवळ केवळ वीस रुपये होते. त्यामुळे त्याने एका ओळखीच्या माणसाकडून चाळीस रुपये उधार घेत 60 रुपयांचं लॉटरीचं तिकिच विकत घेतलं. संध्याकाळी जेव्हा बकऱ्यांना घेऊन तो गावात परतला, तेव्हा आपल्याला लॉटरी लागल्याची बातमी त्याला कळली. 

लॉटरी तिकिट विकणाऱ्या मौलिक शेख या व्यक्तीला रविवारी संध्याकाळी 1 करोडचं पहिलं प्राईज आपल्या लॉटरी सेंटरमधून विकलं गेल्याचं कळलं. त्याने तात्काळ माहिती घेतली असता गावातील मजूर असलेल्या भास्कर माजीने घेतलेल्या तिकिटाला पहिलं बक्षिस मिळाल्याचं कळलं. मौलिक शेख यांनी गावात ही माहिती दिली. मिहाती मिळताच भास्कर माजीच्या घराजवळ त्याला शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली.

भास्कर माजी संध्याकाळी घरी आल्यावर त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. भास्कर माजीचं खुरतुबापूर गावात कच्च्या मातीचं घर आहे. पावसात त्याच्या घराचं छप्पर टपकतं आणि घरात पाणीचपाणी होतं. आता चांगलं घर बनवयाचं आहे. तसंच मुलींच्या लग्नासाठी घेतलेलं कर्जही तो फेडणार आहे. इतरांच्या शेतात जाऊन मजूर करण्यापेक्षा आता गावात थोडीशी जमीन घेऊन शेती करणार असल्याचं भास्कर माजी सांगतो. वडीलांना लॉटरी लागल्याने त्याच्यो दोन मुलीही खुश आहे. देवाने आपल्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.