Mongoose vs Snake: मुंगूसानं केला घात! नाग-नागिणीची सुटली साथ, रक्ताच्या थारोळ्यात जोडीदार पाहून...

Snake Fight: उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) असाच एक प्रकार घडला आहे. बिलसी तहसीलच्या (Bisali) एका डल्लू नावाच्या गावात रामदास ब्रजलाल मेमो इंटर कॉलेजजवळ असाच एक प्रकार घडला आहे.

Updated: Jan 5, 2023, 06:04 PM IST
Mongoose vs Snake: मुंगूसानं केला घात! नाग-नागिणीची सुटली साथ, रक्ताच्या थारोळ्यात जोडीदार पाहून... title=
snake

Mongoose vs Snake: आजकाल सापाचा आणि त्याच्या शत्रूचा फायटिंग व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत राहतो. सध्या अशाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की नागानं आपल्या जोडीदाराला रक्ताच्या (Snake Viral Video) थारोळ्यात पाहून दु:ख अनावर झाले आणि त्यामुळे हा नाग चक्क आपल्या जोडीदाराच्य अंगावर जाऊन बसला. हा व्हिडीओ (Snake Vs Mongoose Viral Video) सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेकदा आपण नाग आणि नागिण यांचा रॉमान्सही व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून पाहतो. तो पाहून आपल्यालही वाटतं की या प्राण्यांमध्ये किती प्रेम आहे. अनेकदा नाग आणि नागिण एकमेकांच्या प्रेमात मरायलाही तयार असतात. हे खरंच घडतं का अशा प्रश्न आपल्यालाही पडतो. त्यामुळे आपणंही असे व्हिडीओ (Snake Romance) बघायचा प्रयत्न करतो. नागाचा जीव वाचवण्यासाठी नागिणही तयार असते. (Viral news black Cobra and Mongoose Deadly Fight Snake Trending news video)

उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) असाच एक प्रकार घडला आहे. बिलसी तहसीलच्या (Bisali) एका डल्लू नावाच्या गावात रामदास ब्रजलाल मेमो इंटर कॉलेजजवळ असाच एक प्रकार घडला आहे. एक नाग चक्क आपल्या जोडीदाराच्या मृतदेहावर बसला आहे. नक्की हा प्रकार झाला तरी काय याबद्दल गावकरीही भ्रमात होते परंतु हा प्रकार गावकऱ्यांनाही कळला नाही. काही गावकऱ्यांच्या मते, एका ठिकाणी त्यांना एक नाग रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्यात त्यावर एक नाग बसलेला दिसला. तेव्हा गावकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला आहे. 

गावकरांच्या म्हणण्यानुसार या गावात वर्षानुवर्षे नाग आणि नागिण (Snake Couple) दाम्पत्य राहत होते. या जोडप्याला कायम गावात किंवा कुठेतरी शेतात ये-जा करताना गावकऱ्यांनीही पाहिले आहे. गावकऱ्यांचं या जोडप्यांबद्दल चांगलं मतं आहे. ते म्हणतात की जोडप्यानं कधीच कोणाला त्रास दिला नाही. त्याउलट कुठल्याही प्रकारे कोणाचं नुकसानंही केले नाही. 

मुंगूस होता वैरी 

गेल्या दोन दिवसांपासून एक मुंगूस (Mongoose) या जोडप्याच्या मागे लागलेला होता. जो सतत यातील एका नागावर हल्ला करत होता. जेव्हा जेव्हा तो नाग किंवा नागिण वेगळे अथवा एकटे दिसायचे तेव्हा मात्र हा मुंगूस कायम त्यांच्यावर हल्ला करायचा. त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करायचा पण नागानं कायमच आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून त्या मुंगूसावर कायमच वार करायचा प्रयत्न केला आहे. नेहमीच त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. गेल्या दोन दिवसात हा प्रकार चालतच होता. शेवटी तो दिवस आला ज्यावेळेला मुंगूसने नागाला मारून टाकले. 

हेही वाचा - Hindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन?

आणि त्यांचा विरह झाला

गावाकऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी नाग आपल्या बिळातून बाहेर आला आणि त्याला रक्तानं माखलेला नागही दिसला तेव्हा त्यानं स्वत:ला आपल्या जोडीदाराच्या अंगावर नेलं. त्या नागाच्या अंगावरून रक्तस्राव होत होता. त्या नागिणीचा मृतदेह तोंडातही पकडलेला होता. हा प्रकार पाहून लोकं अक्षरक्ष: व्हिडीओ काढू लागले. त्यांनी हा क्षण कॅमऱ्यात टिपला आहे. त्यामुळे सगळीकडेच या प्रकारानं खळबळ माजवली आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चचा विषय बनला आहे.