काय सांगता, 30 फूट उंच हवेत उडाला तरुण! तोही पतंगामुळे... हे कसं शक्य? पाहा व्हिडीओ

बापरे! पतंग उडवण्याची हौस अशी भयंकर महागात पडली? पण हे नेमकं घडलं कसं पाहा व्हिडीओ

Updated: Dec 23, 2021, 03:41 PM IST
काय सांगता, 30 फूट उंच हवेत उडाला तरुण! तोही पतंगामुळे... हे कसं शक्य? पाहा व्हिडीओ title=

नवी दिल्ली : पतंग उडवण्याचा नाद धोक्याचा ठरला आणि घात झाला. चक्क पतंगासोबत तरुण 30 फूट उंच उडाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पतंग उडवण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका तरुणासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 

पतंग उडवणारा तरुण 30 फूट हवेत उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण पतंग उडवत असताना त्यासोबत हवेत उडाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या तरुणाला पतंगासोबत उडाल्याचं पाहून जमलेले लोकही हैराण झाले. 

हा तरुण जूटच्या दोरीमध्ये एक मोठा पतंग जोडून उडवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी पतंगासोबत तोही 30 फूट उंचापर्यंत हवेत उडाला. त्याला जमिनीवर खाली आणण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू होते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. 

या व्हिडीओमध्ये नेमकं पतंग आहे की नाही हे देखील दिसलेलं नाही. हा व्हिडीओ एडिट केलेला आहे की खरा आहे याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही.  Sri Lanka Tweet नावाच्या ट्वीटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ह्या व्हिडीओची पुष्टी झी 24 तास करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.