अहमदाबाद : लग्नमंडपात अनेक घटना घडत असतात. कधी पोट धरून हसवतात तर कधी समस्यांचा डोंगर उभा करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिउत्साही वऱ्हाड्यांमुळे नवरदेव आणि नववधूच्या जीवावर बेतता बेतता राहिलं. एवढंच नाही तर एक चूक एवढी महागात पडली की विचारायची सोय नाही.
अति उत्साही वऱ्हाड्यांची करामत पाहता पाहता लग्नात कयामत आली. तुम्हीही जर कुणा जवळच्या किंवा नात्यातील लग्नात अशा गोष्टी करणार असाल तर सावधान! नाहीतर तुमच्यासोबतही असं घडू शकतं.
लग्न मंडपात अति उत्साही वऱ्हाड्यांनी वरातीमध्ये फटाके फो़डले. त्याच्या ज्वाळा उडाल्या आणि घोड्याच्या बग्गीनं पेट घेतला. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील लग्न समारंभामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
लग्न समारंभात वरातीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नवरदेवाच्या बग्गीमध्ये ही आग लागल्यामुळे खळबळ उडाली. आगीमुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
वरातीमध्ये काही लोक फटाके फोडण्यात तर काही नाचण्यात मग्न होते. काही फटाके नवरदेवाच्या बग्गीमध्ये ठेवण्यात आले होते. या बग्गीतील फटाक्यांना आग लागली आणि मोठा भडका उडाला.