PM Narendra Modi investment in NSC: जर तुम्ही कुठे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका शानदार योजनेबाबत माहिती सांगणार आहोत. पंतप्रधानांनी देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवले आहेत.
जून 2020 मध्ये त्यांनी NSC मध्ये 8 लाख 43 हजार 124 रुपये गुंतवले होते. लाईफ इंश्योरेंससाठी त्यांना 1 लाख 50 हजार 957 रुपयांचं प्रीमियम जमा केलं होतं. जाणून घ्या काय आहे ही योजना.
नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate)मध्ये पैसे गुंतवणे म्हणजे कोणतीही अडचण नाही. ही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीमचा भाग आहे.
नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate) मध्ये 5 वर्षासाठी कमीत कमी लॉक-इन पीरिएड असतो. याचा अर्थ तुम्हाला 5 वर्षानंतरच तुम्हाला हे पैसे मिळतील. NSC मध्ये तीन प्रकारे गुंतवणूक केली जावू शकते.
ज्वाइंट ए प्रकार - या सर्टिफिकेटसाठी कोणीही 2 व्यक्ती मिळून गुंतवणूक करु शकतात.
ज्वाइंट बी प्रकार - यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन व्यक्ती लागतात. पण मेच्योरिटी (Maturity) ला पैसे फक्त एकाच व्यक्तीला दिले जातील.
किती करु शकता गुंतवणूक?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या 6.8% टक्के व्याज मिळतं. या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये गुंतवणूक करु शकतात आणि 100 च्या मल्टीपलमध्ये पैसे गुंतवू शकता. यामध्ये कोणतीही मर्यादा नाही.
इनकम टॅक्समध्ये सूट
जर तुम्ही NSC मध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला इनकम टॅक्समध्ये देखील सूट मिळेल. 80C (Section 80C of Income Tax) नुसार प्रत्येक वर्षा 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर सूट मिळू शकते. टॅक्सेबल इनकम असल्यास एकूण रक्कमेतून काही रक्कम कापली जाते.