Viral Bizzare Rituals: प्रियजनांचं मांस खातात, नंतर हाडं घरातच पुरतात; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा...

Bizzare Rtuals of Funeral: दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे जमिनीत पुरलेले मृतदेह बाहेर काढतात. पार्थिलाला सजवतात आणि त्यांच्यासमोर नाचतात. असं केल्याने मेलेली व्यक्ती जिवंत होतो, असं मानलं जातं.

Updated: Jan 20, 2023, 08:32 PM IST
Viral Bizzare Rituals: प्रियजनांचं मांस खातात, नंतर हाडं घरातच पुरतात; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा... title=

Bizzare Rituals of Funeral : अंत्यसंस्कार (funeral) केल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही, असं म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे विविध प्रकार आहेत. भारत देश (INDIA) विविधतेने नटलेला आहे ,अनेक जाती, धर्म, समुदायाचे लोक एकत्र राहतात. जितकी विविधता लोकांमध्ये आहे, तितकीच त्यांच्या रुढी-परंपरांमध्ये पाहायला मिळते.

एक गाव बदललं की परंपरा, चालीरिती बदलत जातात, असं म्हटलं जातं. देशात अनेक प्राचिन रुढी-परंपरा आज देखील जपल्या जातात. त्या कदाचित आपल्याला माहित नसाव्यात. हे झालं फक्त भारताविषयी पण तुम्ही कधी हा विचार केलात का की, या जगात कितीतरी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्या सर्वांच्या किती वेगवेगळ्या प्रथा असतील.संपूर्ण जगभरात अशा अनेक अजब गजब परंपरा आहेत, ज्या आपल्याला माहितच नाहीयेत. चला जाणून घेऊया अशाच काही प्रथांविषयी... 

आपण कदाचित विचारही करू शकणार नाहीत अशा काही प्रथा सध्या समोर येत आहेत ज्या ऐकून आणि वाचून तुम्हाला धक्का बसेल हे नक्की .(Viral bizzare customs rituals of funeral in world). मृत्यू हा अटळ आहे. व्यक्तीच्या मृत्युनंतर त्यांच्यावर जाती, धर्मानुसार अंत्यसंस्कार केलं जातात. प्रत्येक धर्माची एक विशिष्ट परंपरा असते. हिंदू धर्मानुसार, (Hindu Rituals) मृतदेहाचं दहन केलं जात तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात पार्थिव पुरलं जातं. मात्र, काही देश असे आहेत जिथे अंत्यसंस्काराचे नियम (funeral rules) आणि पद्धती जरा विचित्रच आहेत. काही गोष्टींवर विश्वास ठेवणंसुद्धा कठीण होऊन बसतं.  

दक्षिण मेक्सिकोमध्ये मासिक एक वेगळी प्रथा आहे. ज्यामध्ये मृत्यूनंतर मृतदेह घरीच पुरुन ठेवला जातो .त्यामागे एक विश्वास आहे की मृत्यूनंतरसुद्धा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबतच राहतो.आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अंत्यसंस्कारासाठी लागणारे पैसे इथल्या लोकांकडे नसतात इतके ते गरीब आहेत . 

इंडोनेशियामध्ये (INDONESIA) जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर न रडण्याची रूढी आहे कारण इथे मृत माणसांना जिवंतच समजलं जातं आणि आपल्या रडण्याने त्यांना त्रास होईल म्हणून रडायच नाही अशी परंपरा आहे . 

चीन (china) आणि फिलिपाईन्समध्ये (phillipines) मृत्यनंतर मृतदेह शवपेटीत ठेऊन तो उंच खडकावर किंवा उंच ठिकाणी  ठेवला जातो त्यामागे असा समज आहे कि  जितका उंच ठेवला जाईल तितका थेट स्वर्गात जाण्यास मदत होते ..

तिबेटमधील बौद्ध समुदायामध्ये मेल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते गिधाडांना खाण्यास दिले जातात अशीच काहीशी पद्दत पारशी समजत सुद्धा केली जाते यात फक्त Tower of silence मृतदेह ठेऊन जिहादन खायला देण्याची धर्मप्र आहे 

दक्षिण कोरियामध्ये (south korea) मृतदेहातील काही अवयव स्टोनमध्ये जातं करून ते घरात ठेवलं जातात . 

पापुआ न्यू गिनीचे मेलेनेशियन (papua new guinea) आणि ब्राझीलचे (brazil) काही आदिवासी लोक  चक्क मृतदेह कच्चा खाऊन टाकतात .जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासोबतच भीतीच वलय कापून काढण्यासाठी मृतदेह खाल्ला जातो

 मुखतः यात घरातील मुलं सहभागी होतात 

दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह कबरीतून काढतात, त्यांना सजवतात आणि नाचतात असं केल्याने मेलेला माणूस जिवंत होऊन परत येतो अशी इथे पद्दत आहे. (viral bizzare ajab gajab funeral rituals of deadbodies in world know everything in marathi )