विजय रुपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी यांनी आज शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल यांनी शपथ घेतली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 26, 2017, 12:11 PM IST
विजय रुपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

नवी दिल्ली : गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी यांनी आज शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल यांनी शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह आणि एनडीए शासित १८ राज्यांमधील मुख्यमंत्री शपथविधीसाठी उपस्थित आहेत. रूपाणीच्या नवीन कॅबिनेटमध्ये २० जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना लोकांना स्थान मिळणार आहे.