मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी फायरिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओत ही अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या छतावर फायरिंग करताना दिसत आहे. सुरूवातीला रायफलमधून अनेक राऊंड फायरिंग केल्यानंतर पिस्तुलातून फायरिंग करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी समाजवादी पार्टीचे नेता यशेंद्र राजपूत यांची मुलगी आहे. या मुलीच्या वडिलांनी म्हटलं सपा नेता यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला. फायरिंग करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटून या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला.
या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. फायरिंग करणारी ही अल्पवयीन मुलगी बुंदेलखंड डिग्री कॉलेजटे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि सपा नेता यशेंद्र राजपूत यांची मुलगी आहे. यशेंद्र राजपूत यांनी सांगितलं की, हा व्हिडिओ 1 वर्ष जूना आहे. 2017 च्या दिवाळीत त्यांनी आपल्या मुलीला फायरिंगच प्रशिक्षण दिलं होतं. तेव्हा हा व्हिडिओ करून सोशल मीडियावर शेअर केला होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी यावर चर्चा केली. अल्पवयीन मुलीने असं फायरिंग करणं कितपत योग्य आहे असे देखील प्रश्न विचारले जात आहेत.