VIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य

Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे. 

Updated: Jan 24, 2023, 10:59 AM IST
VIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य  title=
Video bageshwar maharaj pandit dhirendra krishan shastri jaya kishori Marriage rumor and fact check viral on social media

Bageshwar Dham Maharaj Jaya Kishori Pandit Married : बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री असा वाद (Dhirendra Krishna Shastri Controversy) सुरु असतानाच  बागेश्वर महाराज जया किशोरीशी  (Jaya Kishori) लग्न करणार आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. जया किशोरी या प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.

लग्न, अफवा आणि सत्य 

'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री हा वाद असतानाच त्यांचा लग्नाची अफवा वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. अशावेळी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी याबाबतची सत्यता सांगितली आहे. ते खरंच किशोरी यांच्याशी लग्न करणार आहेत का या वृत्तवर त्यांनी भाष्य केलं. त्यांनी किशोरी यांच्याशी लग्न करण्याची बातमी फेटाळून लावली आहे. धीरेंद्र शास्त्री आणि जया किशोरी यांच्या लग्नाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ते म्हणाले, 'हे चुकीचे आणि खोटे आहे. आमच्यात अशी कोणतीही भावना नाही.' (Video bageshwar maharaj pandit dhirendra krishan shastri jaya kishori Marriage rumor and fact check viral on social media)

धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोण?

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चे असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगता की, बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छत्तरपूरमधील बागेश्वर धाम मंदिराशी संबंधित आहेत. त्यांचे देशभरात हजारो भक्त आहेत. छत्तरपूरमधील गाडा गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते. असं सांगितलं जातं की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा निर्मोही आखाडाशी जोडलेले होते.

कोण आहे जया किशोरी?

जया किशोरी त्यांच्या भजन आणि भागवत कथेसाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत.सोशल मीडियावरही त्यांचे मोठ्या प्रमाणात फ्लोव्हर्स आहेत. त्यांची भजनं क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. 13 जुलै 1995 रोजी एका आध्यात्मिक कुटुंबात जन्मलेल्या जया किशोरी यांनी आतापर्यंत 350 हून अधिक प्रवचन दिले आहेत. जया किशोरी या मूळच्या राजस्थानचा आहेत. वडील शिवशंकर शर्मा, आई सोनिया शर्मा आणि लहान बहीण चेतना शर्मा असं त्यांचं कुटुंब आहे. आता संपूर्ण कुटुंब कोलकातामध्ये राहते. मिळालेल्या माहितीनुसार जया किशोरी एका कथेसाठी 10 लाख रुपये आकारतात.

लग्नाबाबत काय म्हणतात जया किशोरी?

जया किशोरी अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतात.यादरम्यान त्यांना अनेकदा एक प्रश्न विचारला जातो की त्या लग्न कधी करणार आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, 'मी नक्कीच लग्न करणार आहेत, मी साध्वी नाही.' त्या पुढे म्हणाल्या की, लग्नासाठी अजून योग्य वेळ आहे नाही. होणाऱ्या नवऱ्याबद्दल त्यांचं स्पष्ट मत आहे. लग्नापूर्वी व्यक्तीचा स्वभाव तपासून समजून घेतला पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्याचा स्वभाव पूर्णपणे माहित असेल तेव्हाच लग्न करा. जया किशोरी कायम सांगतात, 'घाईघाईने आणि घाबरून कोणताही निर्णय घेऊ नये.'