Job Vacancy News: नोकरीच्या शोधात असाल तर सुवर्णसंधी, Zomato मध्ये 800 जागांसाठी भरती

झोमॅटोमध्ये तब्बल 800 जागांसाठी नोकरभरती होणार असून कंपनीचे सीईओ दिपिंदर गोयल यांनी LinkedIn वर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. झोमॅटोमध्ये पाच पदांसाठी जागा रिक्त असून एकूण 800 जागा आहेत. एकीकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु असताना झोमॅटोच्या निमित्ताने नोकरी शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी मिळाली आहे.   

Updated: Jan 24, 2023, 10:27 AM IST
Job Vacancy News: नोकरीच्या शोधात असाल तर सुवर्णसंधी, Zomato मध्ये 800 जागांसाठी भरती title=
Zomato मध्ये 800 जागांसाठी भरती

Job Vacancy News: सध्या अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात असल्याने नोकरदार वर्ग चिंतेत आहे. गेल्या काही दिवसात मायक्रोसॉफ्ट (Microsoft), अॅमेझॉन (Amazon), गुगल (Google), मेटा (Meta) आणि ट्विटरमध्ये (Twitter) मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात करण्यात आली आहे. नुकतंच स्पॉटिफायनेही (Spotify) कर्मचारीकपात केली जाणार असल्याची घोषणा केली असून सहा टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारीकपात केली जात असल्याने चिंता सतावत असताना झोमॅटोने (Zomato) मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी LinkedIn वर कर्मचारी भरती केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. इंजिनिअर, प्रोडक्ट मॅनेजर, ग्रोथ मॅनेजर अशा वेगवेगळ्या पदांसाठी 800 जागा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांची LinkedIn पोस्ट

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या अकाऊंटवर पाच पदांसाठी जागा असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये चीफ ऑफ स्टाफ टू सीईओ (Chief of Staff to CEO), जनरलिस्ट (Generalist), ग्रोथ मॅनेजर (Growth Manager), प्रोडक्ट ओनर (Product Owner) आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर (Software Development Engineer) यांचा समावेश आहे.

"या पाच पदांसाठी आमच्याकडे 800 जागा आहेत. या पदांसाठी जर तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्यांना टॅग करा," असं आवाहन त्यांनी केलं आहे.

या पदांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मला deepinder@zomato.com या मेल-आयडीरव मेल करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला लगेच उत्तर देईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

Zomato Job Vacancy Post

झोमॅटोचा फूड डिलिव्हरी घोटाळा

नुकतंच झोमॅटो डिलिव्हरी एजंट ग्राहकांना आपल्या ऑर्डरसाठी कंपनीला पैसे न देता आपल्याला पैसे द्या सांगत घोटाळा करत असल्याचं समोर आलं होतं. LinkedIn वर एका युजरने हा घोटाळा समोर आणत दिपिंदर गोयल यांच्या निदर्शनास आणून दिला होता. ही पोस्ट व्हायरल झाली होती.

"30 ते 40 मिनिटांनी डिलिव्हरी बॉय आला असताना त्याने मला पुढच्या वेळी ऑनलाइन पेमेंट करु नका सांगितलं. मी त्याला का असं विचारलं असता त्याने सांगितलं की, पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा 700 ते 800 रुपयांची ऑर्डर द्याला तेव्हा त्यासाठी फक्त 200 रुपये द्यावे लागतील. मी झोमॅटोमध्ये तुम्ही ऑर्डर स्वीकारली नाही असं दाखवेन, पण तुम्हाला ती ऑर्डर देणार. तुम्ही फक्त मला 200, 300 रुपये द्या आणि 1000 रुपयांच्या जेवणाची मजा घ्या," असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. 

दिपिंदर गोयल यांनी आपल्याला या घोटाळ्याची कल्पना असून त्यावर तोडगा काढत असल्याचं म्हटलं आहे.