केरळ : प्रसिद्ध सर्पमित्र वावा सुरेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोब्राला पकडत असताना सापानं त्याला दंश केला. ज्यामुळे आता त्याची प्रकृती गंभीर आहे. आकाराने मोठ मोठे साप पकडणारा वावा सुरेश कोब्राला पकडत असताना कोब्राने असा काही त्याच्यावरती हल्ला केला की, हे वावा सुरेशला ही कळलं नाही. अनेक वर्ष सापाला पकडण्यात पटाईत असलेल्या वावा सुरेशला यावेळी मात्र सापाची चाल कळली नाही.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये वावा सुरेश सापाला पकडत असताना, अचानक साप मागे फिरतो आणि वावा सुरेशच्या पायाला दंश करतो. अगदी 10 सेकंदाचा हा व्हिडीओ मन हेलावून टाकणारा आहे. या घटनेनंतर वावा सुरेशला कोट्टायम जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. केरळमधील प्रसिद्ध सर्पमित्र वावा सुरेश हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाची लढाई करत आहेत.
कोट्टायम जिल्ह्यात बचाव मोहिमेदरम्यान त्याला कोब्राने चावा घेतला होता. वावा सुरेशला कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (एमसीएच) दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांनी 2 जानेवारीला त्याने डोळे उघडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरं दिली आहेत. त्याच्या तब्येतीच इंप्रुमेंट आणि त्याचा रिस्पॉन्स पाहून डॉक्टरांनी व्हेंटीलेटर सपोर्ट काढून टाकला आहे. परंतु पुढचे 48 तास त्याच्यासाठी जोखमीचे आणि महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.
तसे पाहता सुरेश वाव यांनी साप चावण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी आतापर्यंत 50 हजारांहून अधिक सापांची सुटका केली आहे. यादरम्यान त्यांना आतापर्यंत 250 हून अधिक सापांनी चावा घेतला, परंतु प्रत्येक वेळी सर्पमित्राने मृत्यूला परतवून लावलं आहे. त्यामुळे यावेळी देखील तो मृत्यूसमोर परतवून लावेल असा लोकांचा विश्वास आहे.