रेल्वेत ८६१९ पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांनी करा अर्ज

 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी)ने नोकरभरतीचे मोठ्या प्रमाणात आवाहन केलंय.

Updated: May 24, 2018, 03:31 PM IST
रेल्वेत ८६१९ पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांनी करा अर्ज  title=

नवी दिल्ली : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी)ने नोकरभरतीचे मोठ्या प्रमाणात आवाहन केलंय.  या भरतीमार्फत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉंस्टेबर पदाच्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पुरूष आणि महिला दोघांसाठीही भरती असणार आहे.  नियुक्त होणाऱ्या उमेदवारास रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये नियुक्त करण्यात येईल. त्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या तिसऱ्या लेवल आधारावर पगार दिला जाणार आहे. या भरतीमध्ये ८ हजार ६१९ उमेदवार निवडण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ४,४०३ पुरूष आणि ४,२१६ महिला उमेदवारांच्या जागा रिक्त आहेत. 

अंतिम तारीख 

१ जून ते ३० जून 

पात्रता 

१० वी पास अर्ज करु शकतात. 

कुठे कराल अर्ज

constable.rpfonlinereg.org किंवा www.indianrailways.gov.in वर लॉग इन करा. 

निवड प्रक्रिया

संगणक आधारित टेस्ट (सीबीटी) आणि शारिरीक मोजमाप आणि क्षमता चाचणीच्या आधारवार उमेदवारांची निवड 

शुल्क 

खुला वर्ग आणि ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना ५०० रुपये 
एस.सी-एस.टी वर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये