भारतीय नौदलात भरती, ५६ हजार ते २ लाखांपर्यंत पगार

भारतीय नौदलामार्फत देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ५६ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी १ जुलै १९९९ ते २ जानेवारी १९९४ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2018, 06:57 PM IST
 भारतीय नौदलात भरती, ५६ हजार ते २ लाखांपर्यंत पगार  title=

नवी दिल्ली : भारतीय नौदलामार्फत देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ५६ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 

या पदांसाठी भरती :

ऑब्झर्व्हर 
पायलट - एमआरव्यतिरिक्त 
एअर ट्राफिक कंट्रोलर
पायलट - एमआर 

अशी होईल निवड :

 सर्व्हिस सिलेक्श बोर्डात (एसएसबी) झालेल्या मुलाखतीद्वारे उमेदवार निवडलले जातील. 

एवढा मिळेल पगार :

उप लेफ्टनंट पदासाठी ५६,१०० ते १ लाख १० हजार ७०० रु. 
लेफ्टनंट पदासाठी ६१ हजार ३०० ते १ लाख २० हजार ९०० रु.
लेफ्टनंट कमांडर पदासाठी ६९ हजार ९०० ते १ लाख ३६ हजार ९०० रु.
कमांडर पदासाठी १ लाख २१ हजार २०० ते २ लाख १२ हजार ४०० रु.

एकूण पदं :

१९ पदे

अशी आहे अट 

यासाठी २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यान जन्मलेले उमेदवार  दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

 ४ मार्च २०१८