Landsilde in Uttrakhand: नऊ वर्षांपुर्वी उत्तराखंड (Uttarakhand) भागात आलेल्या महापूरामुळे हादरलेलं रूद्रप्रयाग (Rudraprayag) हे शहर आता पुन्हा एकदा दरड कोसळल्यानं हादरलं आहे. सध्या शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. अशाच एका डोंगराळ भागात दरळ कोसळतानाचा लाईव्ह व्हिडीओ (Live Video of Landslide in Rudraprayag) समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. (uttarankhand floods : landslide caught on camera live footage goes viral see video)
सध्या उत्तराखंड येथील राष्ट्रीय महामार्ग (National Highhway 10) ब्लॉक करण्यात आला आहे. येथे सध्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा - नुकतंच लग्न झालेल्या Shama Sikandar ला Baby Planning च्या 'त्या' प्रश्नावर राग का आला?
अजमेर, राजस्थानच्या भिलवारा आणि इतर ठिकाणाहून येणारे एकूण 400 प्रवासी (Pilgrims) सध्या या अपघातांमुळे शहरात अडकले आहेत. गंगोत्रीवरून हे सर्वच प्रवासी परत येत असताना मधल्या वाटेत सर्व प्रवासी लॅन्डस्लाईडमुळे अडकले. स्टेट डिझास्टर रिपॉन्स फॉर्स (State Disaster Response Force) ने सांगितलं की राजस्थानवरून आलेल्या यात्रेकरूंना गुरूवारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे.
आणखी वाचा - घरात झुरळं कानाकोपऱ्यात लपून बसतायत? असा तयार करा घरगुती स्प्रे...
त्याचबरोबर उर्वरित यात्रेकरू आणि प्रवाशांसाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केलं असून सर्व यात्रेकरूंसाठी पाण्याची व्यवस्था, अन्नाची व्यवस्था आणि इतर सोयीसुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Uttarakhand: NH-109 in the Rudraprayag district blocked yesterday after a sudden landslide led to the roll down of debris near Tarsali Village
DM Mayur Dixit said, all travellers stopped at safe places. Once the debris is cleared, vehicular movement will be started. pic.twitter.com/tb4Sz61AsR
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 22, 2022
आपत्ती व्यवस्थापनानं तवाघाटजवळ अडकलेल्या 42 आदि कैलास यात्रेकरूंची सुटका केली आहे. हे यात्रेकरू मुसळधार पावसामुळे रस्ता अडवल्यामुळे यात्रेतून परत येताना ते अडकले होते. हे यात्रेकरू प्रामुख्याने राजस्थान (Rajasthan), गुजरात (Gujrat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि दिल्ली (Delhi) येथील होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुसळधार पावसामुळे गुंजीत चार दिवस अडकून पडलेल्या व्यास खोऱ्यातील 50 गावकऱ्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.