पोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोर

सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून युजर्सने संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे चिमुरड्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना माऊलीने त्याचा व्हिडिओही बनवला.

राजीव कासले | Updated: Jul 18, 2024, 03:40 PM IST
पोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोर title=

Viral Video : पोटच्या मुलांसाठी आई-वडिल वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. चिमुरड्याच्या छातीवर बसून ती महिला मुलाला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. मुलगा वारंवार पाणी मागताना दिसत आहे, पण आईचं ह्रद्य जरी पिघळत नाही. त्याल वारंवार जमिनीवर आपटून त्याला मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे मुलाला मारहाण करताना या महिलेने त्याचा व्हिडिओही बनवला आहे. (Mother Brutally Beating to her Son)

काय आहे नेमकी घटना?
मन हेलावून टाकणारी ही घटना उत्तराखंडमधल्या रुडकी (Roorkee) इथल्या झबरेडा इथली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. एक आई आपल्या पोटच्या मुलाला इतक्या अमानुषपणे मारहाण कशी काय करु शकते असा प्रश्न लोकांना पडला आहे. आपल्या मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत आई मुलांना चांगले धडे देते. पण या व्हिडिओत अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला आई अत्यंत क्रुर पद्धतीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही महिला खरच त्या मुलाची आई आहे असा प्रश्नही युजर्स विचारत आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी या निर्दयी आईवर कठोर कारवाई करणअयाची मागणी केली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्या महिलेच्या घरी धडक दिली. पोलिसांच्या चौकशी त्या महिलेने मुलाला मारहाण करण्याचं कारण सांगितलं. 

मारहाण करताना व्हिडिओ बनवला
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ दोन मिनिटांचा असून यात एक महिला आपल्या 12 वर्षांच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. केवळ मारहाणच नाही तर ही महिला त्या मुलाच्या छातीवर बसून त्याचं डोकं जमिनीवर आपटतेय, मध्येच त्याचा गळा दाबतानाही दिसतेय. मारहाणीने मुलगा आईकडे पाणी मागतोय, पण याकडे दुर्लक्ष करत आई त्याला मारहाण सुरुच ठेवतेय. मुलाला मारहाण करताना ही महिला व्हिडिओही बनवतेय. एका व्यक्तीला तीने हा व्हिडिओ बनवायला सांगितला असावा कारण व्हिडिओ बनतोय की नाही असं ती समोरच्या व्यक्तीला विचारतानाही दिसतेय. 

मारहाण करणारी ही महिला झबरेडा इथे एका कपड्यांच्या दुकानात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत महिलेचं नावही देण्यात आलं आहे. यावरुनच पोलिसांनी महिलेचं घर गाठलं.

मारहाणीचं धक्कादायक कारण
मारहाण करणाऱ्या महिलेचं माहेर हे झबरेडा इथं आहे. तिचं देवबंदमध्ये राहाणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न झालं. पण काही वर्षांनी दोघं विभक्त झाले. पोलिसांनी मुलाला मारहाणीचं कारण विचारल्यावर तीने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. ही महिला आपल्या तीन मुलांसह झबरेडामध्येच राहाते. मुलांच्या खर्चासाठी ती पतीकडे पैसे मागत होती, पण पती पैसे देत नसल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी तीने मुलाला मारहाण करुन त्याचा व्हिडिओ पतीला पाठवून दिला. पतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

महिलेला मानोसोपचाराची गरज
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतं असून मुलाला बाल कल्याण विभागात पाठवण्यात आलं आहे. महिलेची मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे.