Shocking News : आई आणि मुलाचं नातं म्हणजे जगातलं सर्वात पवित्र नातं. पण याच नात्याला लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच सावत्र आईशी लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती मिळताच मुलाच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठत मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सावत्र आई आणि मुलाचं लग्न हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
हे प्रकरण उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगर (Udham Singh Nagar) जिल्ह्यातल्या कोतवाली बजपूर इथलं आहे. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 वर्षांपूर्वी त्यांनी दुसरं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत. पण वडिलांनी दुसरं लग्न केल्यावर दोन्ही मुलं त्यांना सोडून गेली. पण त्यांचं घरी येणं-जाणं सुरु होतं. याचदरम्यान मोठ्या मुलाचं सावत्र आईशी सूत जुळलं.
काही दिवसांपूर्वी दुसरी पत्नी माहेरी गेली होती, पण अनेक दिवस उलटल्यानंतरही ती सासरी परतली नाही. वडिलांनी चौकशी केल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांची पत्नी मोठ्या मुलाबरोबर रहात असून त्याने सावत्र आईशी लग्नही केलं होतं. वडिल जेव्हा पत्नीला आणायला त्यांच्या घरी गेले तेव्हा मुलाने त्यांना मारहाण केली. इतकंच नाही तर पत्नीही त्यांच्यासोबत परत जाण्यास नकार दिला.
याविरोधात पीडित व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाणे गाठत मुलगा आणि पत्नविरोधात तक्रार दाखल केली. पत्नीने घर सोडताना 20 हजार रुपये नेल्याचा आरोपही त्याने केला आहे. तक्रारीनंतर आता याप्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.
या विचित्र प्रकरणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.