लष्कराने नाही उतरु दिलं मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर, हॅलिपॅडवर ठेवले ड्रम

लष्कराच्या एका अधिकाऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांच्याच हॅलिकॉप्टर लँडिंगला मनाई केली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2018, 08:24 AM IST
लष्कराने नाही उतरु दिलं मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर, हॅलिपॅडवर ठेवले ड्रम title=

नवी दिल्ली : लष्कराच्या एका अधिकाऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांच्याच हॅलिकॉप्टर लँडिंगला मनाई केली.

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या हॅलीकॉप्टरला देहरादूनच्या जीटीसी हॅलिपॅडवर लँडींग करण्यासाठी लष्कराने नकार दिला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने या हॅलिपॅडवर २ ड्रम ठेवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी याची तक्रार लष्कराकडे केली आहे.

या तक्रारीमध्ये लिहिण्यात आलं आहे की, मुख्यमंत्र्यांची गाडी जेव्हा जीटीसी हॅलिपॅडच्या मुख्य द्वारावरुन जात होती तेव्हा एका लष्कर अधिकाऱ्याने त्यांचा रस्ता रोखून धरला. यामुळे मुख्यमंत्र्यांना बराच काळ थांबावं लागलं. लष्कराचा अधिकारी गाडी न हटवण्याच्या मतावर ठाम होता. अधिकाऱ्याने म्हटलं की, हा लष्कराचा विभाग आहे. पण जेव्हा अधिकाऱ्याला कळालं की गाडीत मुख्यमंत्री आहेत. तेव्हा अधिकाऱ्याने आपली गाडी बाजुला केली.

यानंतर सीएम यांचं हॅलिकॉप्टर तेथे लँड होणार होतं. तर लष्काराच्या काही अधिकाऱ्यांनी २ ड्रम हॅलिपॅडवर ठेवले. ज्यामुळे हॅलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी लँड करावं लागलं. मुख्यमंत्री रावत येथे सावणी भागात झालेल्या अग्निकांडातील पीडितांना मदत करण्यासाठी तेथे जात होते.