मुलगी व्हॉट्सअॅपवर जास्त वेळ असते म्हणून लग्नादिवशीच तोडलं नातं

इथे एका मुलीचं लग्न एवढ्याचं कारणासाठी तुटलं की ती तासनतास व्हॉट्सअॅपवर असते. 

Updated: Sep 9, 2018, 11:52 AM IST
मुलगी व्हॉट्सअॅपवर जास्त वेळ असते म्हणून लग्नादिवशीच तोडलं नातं title=

नवी दिल्ली : भारतात लग्न तुटण्याचं कोणतही कारण असू शकतं. कोणी हुंडा दिला नाही म्हणून लग्न तोडत तर कोणता नवरा जास्त दारू पितो म्हणून लग्न तुटतं. कधी काळा रंग असतो म्हणून लग्न तुटत तर कधी कमी शिक्षण असतं म्हणूनही लग्न तुटतं.

पण उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये वेगळंच प्रकरणं समोर आलंय. इथे एका मुलीचं लग्न एवढ्याचं कारणासाठी तुटलं की ती तासनतास व्हॉट्सअॅपवर असते.

'वरात आलीच नाही'

लग्नाच्यादिवशी मुलीचा परिवार आणि नातेवाईक वाट बघत राहिले पण नवऱ्याची वरात काही आली नाही. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की, 'मुलगी व्हॉट्सअॅपवर जास्तवेळ असते यावर नवरा नाराज आहे म्हणून आम्ही लग्नाला नकार देतोयं.' अशाप्रकारे लग्नाच्यादिवशीच न बनलेलं नातं तुटण्याची वेळ आली.

65 लाखांची मागणी

मुलीच्या परिवाराने हे आरोप धुडकावून लावले आणि नवऱ्याकडून 65 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा आरोप केलायं. मुलीच्या वडिलांनी मुलगा आणि त्याच्या परिवाराविरूद्ध तक्रार केलीयं. नौगावा सादातच्या शाहफरीद येथे राहणाऱ्या मेंहदी याचे फकरपुरायेथील कमर हैदरशी लग्न ठरलं होतं.

5 सप्टेंबला संध्याकाळी वरात येणार होती. मुलीच्या परिवाराने याची पूर्ण तयारीही केली होती. वरातीला रात्र झाली म्हणून नवऱ्याकडच्या मंडळींना फोन केला त्यावेळी मुलीच्या व्हॉट्सअॅपचे कारण समोर करण्यात आले.

आरोप-प्रत्यारोप

मुलगी दिवसरात्र व्हॉट्सअॅपवर असते आणि खूप लोकांना मेसेज पाठवत असल्याचे समजल्यावर आम्ही लग्न तोडल असं नवऱ्याच्या वडिलांनी सांगितली. आम्ही लग्नाची तारीख ठरवलीच नव्हती त्यामुळे वरातीची तयारी करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.

लग्नाआधी नवऱ्याकडून 65 लाख रुपये मागितले आणि न दिल्याने व्हॉट्सअॅप प्रकरण काढल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले.