उत्तर प्रदेश : कुख्यात गुंड आता टपाल तिकीटावर, सरकारचा निष्काळजीपणा

कुख्यात गुंड छोटा राजन (Don Chhota Rajan) आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या (Indian Postal Department) 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले आहे.

Updated: Dec 28, 2020, 02:17 PM IST
उत्तर प्रदेश : कुख्यात गुंड आता टपाल तिकीटावर, सरकारचा निष्काळजीपणा  title=

रामराजे शिंदे / नवी दिल्ली : कुख्यात गुंड छोटा राजन (Don Chhota Rajan) आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या (Indian Postal Department) 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल तिकीट (postage stamps) पाच रुपयांचे असून १२ टपाल तिकीट छोटा राजन आणि १२ मुन्ना बजरंगीचे आहेत. टपाल खात्याला यासाठी ६०० रुपये फी दिली गेली. तिकिटांची छपाई करण्यापूर्वी ना छायाचित्रांची तपासणी केली गेली की, ना प्रमाणपत्र मागितले गेले.

डाक टिकट पर डॉनः छोटा राजन और मुन्ना बजरंगी के डाक टिकट छाप दिए, अब जांच होगी

टपाल तिकिटावर गुंड आणि माफियांची छायाचित्रे छापता येतील का? हा प्रश्न आम्ही तुम्हाला यासाठी विचारलाय की कुख्यात गुन्हेगाराचे टपाल तिकीट छापण्याचा कारनामा उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडला. साहजिकच अशी तिकीट तर छापता येत नाही, परंतु जर सिस्टममध्ये एखादी त्रुटी असेल तर गुन्हेगाराचे सुद्धा टपाल तिकीट छापता येऊ शकते. कानपूरमध्ये नेमकं हेच घडले आहे. इथे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय माफिया छोटा राजन आणि बागपत कारागृहात झालेल्या चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी हे टपाल तिकिटे बनले आहेत. या तिकिटांच्या माध्यमातून देशात कुठेही पत्रे पाठविली जाऊ शकतात.

छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल अशा परिस्थितीत हिंसा करणाऱ्या गुन्हेगारांचाच काय तर दहशतवाद्यांचा शिक्काही छापला जाऊ शकतो, हेच यावरुन दिसून येत आहे.

कुठे राहीली त्रुटी

- जीवंत व्यक्तचेच तिकीट बनवले जाऊ शकते.
- तिकीट बनवण्यासाठी व्यक्तीला स्वत: पोस्ट आफीसमध्ये हजर रहावे लागते
- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तपासून पाहिले जाते
- अधिकाऱ्यासमोर फोटो काढावे लागतात
- व्यक्तीची सर्व माहिती दिली जाते. त्यानंतर पडताळणी केली जाते.
 
परंतु यापैकी कोणतीही प्रक्रिया टपाल खात्याने पाळली नाही. या संदर्भात आता चौकशीचे आदेश टपाल खात्याने दिले आहेत. परंतु झालेली घोडचूक कशी भरून काढणार हा प्रश्न आहे.