धक्कादायक! पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधी, तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार

तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार झाला, पहिल्या बलात्काराची तक्रार द्यायला ती आली होती...

Updated: May 4, 2022, 08:47 PM IST
धक्कादायक! पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधी, तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार title=

Shocking News : सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या मुलीवर एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्याच्या आवारातील खोलीत नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी पीडित मुलगी आपल्या मावशीसह पोलीस स्थानकात आली होती. पण पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधीच तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार झाला. उत्तर प्रदेशमधल्या ललितपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधिकाऱ्याला प्रयागराजमधून अटक
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ललितपूरचे एसएचओ तिलकधारी सरोज याला पोलिसांनी प्रयागराज इथून अटक केली आहे. 

अखिलेश यादव यांनी घेतली भेट
सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अखिलेश यांनी सरकारवर हल्लाबोल करत हातरस पीडितेलाही या सरकारमध्ये न्याय मिळाला नसल्याचा आरोप केला. आता पोलिस स्टेशनवर बुलडोझर चालणार का? असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.

प्रियंका गांधी यांनीही केली टीका
या घटनेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही योगी सरकारवर निशाणा साधला आहे.  ललितपूरमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर तक्रार घेताना पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याची घटना निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटंल आहे. महिलांसाठी पोलीस ठाणेच सुरक्षित नसतील, तर तक्रारी कुठे घेणार? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे.