कारमध्ये प्रेयसीसोबत रंगला रोमांस, बायकोनं रंगेहात पकडलं आणि...

बायकोची नजर चुकवून प्रेयसीसोबत प्रेमाचे चाळे करणं भोवलं आहे. 

Updated: Jan 21, 2021, 08:59 PM IST
कारमध्ये प्रेयसीसोबत रंगला रोमांस, बायकोनं रंगेहात पकडलं आणि... title=

बांदा (उत्तर प्रदेश) : लग्नानंतर प्रेम करणं आणि बायकोच्या माघारी ते लपवणं त्याहूनही धाडसी आणि जिकिरीचं. एका व्यक्तीला हे प्रेमाचं लफडं चांगलंच महागात पडलं आहे. अनेकदा सिनेमा, सीरियल, वेबसिरीजमध्ये आपण सीन पाहातो की पतीला रंगेहात बायको पकडते. असाच प्रकार एका व्यक्तीच्या आयुष्यात घडला. बायकोची नजर चुकवून प्रेयसीसोबत प्रेमाचे चाळे करणं भोवलं आहे.

बायकोनं प्रेयसीसोबत कारमध्ये लपून प्रेमाचे चाळे करणाऱ्या पतीला रंगेहात पकडलं आहे. या लव्ह स्टोरीची पूर्ण गावात चर्चा रंगली आहे. हा व्यक्ती प्रेयसीला कारमध्ये बसवून प्रेमानं डोसा भरवत होता. घास भरवत असतानाच अचानक समोरून पत्नी आली आणि घाम फुटला.

पत्नीनं रंगेहात पकडल्यानंतर मात्र गदारोळ पसरला. प्रेयसी आणि बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. तू-तू मैं-मैं वरून हे भांडण एकमेकांच्या झिंजा उपटण्यापर्यंत पोहोचलं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते हे पाहून तातडीनं याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि वाद सोडवला.

उत्तर प्रदेशातील बांदा इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीला सोडून बाहेर लफडं करणाऱ्या व्यक्तीला बायकोनं रंगेहात पकडलं. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर दोन्ही बाजूच्यांना पोलिसांनी समजवलं आणि वाद मिटवला. तर पत्नीने आपल्या नवऱ्याच्या या वागण्याला वैतागून घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे.