लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. १३ खाजगी दंत महाविद्यालय आणि २३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी सरकारनं निर्धारीत करण्याचा निर्णय घेतलाय.
उत्तर प्रदेशात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतलाय गेलाय. फी निर्धारित करतानाच एबीबीएस अभ्यासक्रमासाठी ८.५० लाख रुपयांपासून ते ११.५० लाख रुपये फी निर्धारित करण्यात आलीय. तर बीडीएसाठी १.३७ लाख ते ३.६५ लाख रुपये फी ठरवण्यात आलीय.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० साठी ही फी निर्धारित करण्यात आलीय. योगी सरकारच्या या निर्णयामुळे खाजगी महाविद्यालयांच्या मनमानी कारभारावर अंकुश लागणार आहे.