Murder Mystrey : कोणाताही पुरावा नसताना पोलिसांना एका हत्येचं गुढ (Murdre Mystrey) उकलण्यात यश आलं आहे. तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा शोध लावला. विशेष म्हणजे हे प्रकरण आता पोलीस ट्रेनिंगमध्ये (Police Training) अभ्यासासाठी ठेवलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) आंबेडकर नगर पोलीस क्षेत्रात ही घटना घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला. 11 जूनाल आंबेडकर नगर परिसरातली बेवाना इथं एक बंद पडलेल्या शाळेत 90 टक्के जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला. मृताच्या हत्येचा कोणताही पुरावा नव्हता. पण मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांनी कंडोमचं एक पाकिट मिळालं.
मर्डर मिस्ट्रीचा खुलासा
बेवानातल्या बंद पडलेल्या शाळेत 90 टक्के जळालेला मृतदेह आढळून आला. परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पण मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्यांना कोणताच पुरावा सापडत नव्हता. हा मृतदेह कोणाचा आहे? इथे कुणी टाकला याचा पोलीस शोध घेत असतानाच पोलिसांना मृतदेहापासून काही अंतरावर कंडमोचं एक पाकिट सापडलं. या एका पुराव्यावरुन पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांना अटक केली. पोलिसांच्या कामाचं आता सर्व स्तरातून कौतुक होतंय.
असा लावला छडा
घटनास्थळी पोलिसांबरोबरच फॉरेन्सिक टीमने तपास सुरु केला. हा मृतदेह पुरुषाचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर मृतेदह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. कठोर तपासानंतरही पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागत नव्हता. शोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी घटनास्थळी एक कंडमोचं पाकिट आढळलं. त्यानंतर त्या ब्रांडचं कंडोम कुठे मिळतं याचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दिल्ली एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या काही जिल्ह्यांमध्ये या ब्रँडची कंडोम मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने या जिल्ह्यातील कोणते मोबाईल घटनास्थळाजवळ होते हे ट्रेस केलं. यात चार नंबर ट्रेस झाले, यातील एक मोबाील नंबर बंद होता. बंद असलेला मोबाईल मृतकाचा होता. याआधारावर पोलिसांनी तपास सुरु केला. बंद असलेल्या मोबाईलचं सिम कार्ड कुठून विकत घेतलं गेलं याचा शोध लावला असता सहारनपूरमधला हा नंबर असल्याचं पोलिसांना कळालं. सहारनपूरचे चार जण सर्कस दाखवण्याचं काम करतात. यातील एक जण बेपत्ता होता.
एक एक धागा जुळवत पोलिसांनी तपास सुरु केला आणि मृत व्यक्तीबरोबर असलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्या तपासात मृत् व्यक्तीचं नाव अजब सिंह रंगीला असल्याचं निष्पन्न झालं. अजब सिंहचे आरोपींमधल्या इरफान याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. यावरुन इरफाननने अजब सिंहला अनेकवेळा बजावलं होतं. पण तो ऐकत नव्हता. त्यातच अजब सिंहने सर्कशीतलं काही सामान विकंल होतं. यावरुन इतर तीन जण त्याच्यावर नाराज होते.
आरोपीने कट रचत अजबि सिंह रंगीलाला दारु पिण्याच्या बहाणयाने बंद असलेल्या शाळेच्या इमारतीत नेलं. तिथे त्याला आधी दारु पाजली त्यानंतर त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्याच्या खिशातलं सर्व सामान त्यांनी बाहेर काढलं. पण ते काढत असताना कंडोमचं पाकिट तिथेच पडलं. त्यानंतर आरोपींनी पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला. कंडोचं पाकिट तसंच राहिलं आणि ती एक चूक आरोपींना भोवली. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना केवळ एका कंडोमच्या पाकिटावरुन आरोपींचा छडा लावला.