भीषण रस्ता अपघात : ट्रक - बसच्या जोरदार धडकेत 18 जणांचा मृत्यू

 बाराबंकी (Barabanki ) जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.  

Updated: Jul 28, 2021, 08:09 AM IST
भीषण रस्ता अपघात : ट्रक - बसच्या जोरदार धडकेत 18 जणांचा मृत्यू title=

मुंबई : Uttar Pradesh Barabanki Accident: उत्तर प्रदेशमधील बाराबंकी (Barabanki ) जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-अयोध्या महामार्गावर उभ्या असलेल्या डबल डेकर बसला मंगळवारी रात्री उशिरा ट्रकने जोरदार धडक दिली, त्यामध्ये 18 जणांचा बळी गेला आहे. (Uttar Pradesh: 18 people killed in heavy road accident in Barabanki)

बस रस्त्याच्या कडेला उभी होती

पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर चालकाने रात्री आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दरम्यान, मागून येणाऱ्या ट्रकने रात्री बाराच्या सुमारास डबल डेकर बसला जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात काही लोकांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले, ही बस हरियाणाच्या पलवलहून निघाली होती आणि बिहारकडे जात होती.

 या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अपघातानंतर रस्ता वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी रस्ता मोकळा केला आहे. अपघातानंतर एडीजीने रुग्णालयात जाऊन जखमींची प्रकृती जाणून घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस खराब झाल्यानंतर चालकाने प्रवाशांना विश्रांती घेण्यास सांगितले आणि त्याने बसची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अचानक मागून येणाऱ्या एका ट्रकने बसला धडक दिली आणि हा अपघात झाला.

20 लोक जखमी

एडीजी लखनऊ झोन सत्यनारायण सबात यांनी सांगितले की ही बस राम सनेही घाटजवळ उभी होती आणि रात्री उशिरा ट्रकने धडक दिली. या अपघातात 19 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही मृतदेह अजूनही बसच्या खाली  आहेत. घटनास्थळी पोलीस मदत आणि बचाव कामात गुंतले आहेत.