जीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद

कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?

Updated: Jan 9, 2023, 05:34 PM IST
जीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद title=

Heart Attack In Winter: गेल्या 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे (Heart Attack) मृत्यू झालाय. थंडीत (Winter) हार्ट अटॅकमुळे मृत्यूंची संख्या वाढल्यानं मोठी खळबळ उडालीय. थंडीमुळे रक्तदाब वाढणं आणि रक्तगुठळी होण्याचं प्रमाण वाढणं, याचा हा परिणाम असल्याचं डॉक्टरांचं म्हणणंय. तसंच, कोरोनामुळे लोकांच्या प्रकृतीवर आधीच परिणाम झालाय, हेही लक्षात घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात. गेल्या 8 दिवसांत 114 जणांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालाय.  

उत्तर भारतात थंडीची लाट
उत्तर भारतात (Uttar Pradesh) थंडीची लाट आली असून ही थंडी आता जीवेघणी ठरत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये (Kanpur) हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांनी संपूर्ण भारताला हादरवून टाकलं आहे. कानपूरमध्ये एसपीएस हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये (SPS Heart Institute) गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्ट आणि ब्रेन अटॅकमुळे (Heart and Brain Attack) तब्बल 114 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. एलपीएस इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजीने (LPS Institute of Cardiology) ही आकडेवारी जाहीर केली आहे. कानपूरमधल्या लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड कार्डियाक संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी एका दिवसात ह्दयासंदर्भातील आजाराच्या 723 रुग्णांची नोंद झाली.

हृदयरोग संस्थेचे डॉक्टर विनय कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्चरक्तदाब, मधुमेह आणि ह्रदयाशी संबंधित रुग्णांसाठी अति थंडी जीवघेणी ठरू शकते. केवळ वयस्क लोकांनांच नाही तर तरुणांना याचा धोका आहे. एका अहवालानुसार 

40 वर्षापेक्षा कमी - 19 जणांचा मृत्यू
40 ते 60 वर्ष - 36 जणांचा मृत्यू
60 हून अधिक वर्ष  -  59 जणांचा मृत्यू

सात दिवसात 373 रुग्ण
गेल्या सात दिवसात रुग्णालयात 373 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 218 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर 114 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षात एका आठवड्यातील हा मृतांचा सर्वाधिक आकडा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

हे ही वाचा : 'मम्मी-पप्पा आता स्ट्रेस सहन होत नाही...' चिठ्ठी लिहित ज्युनिअर डॉक्टरने संपवलं जीवन

हार्ट अटॅकपासून कसं वाचाल? 

थंडीत का होतात मृत्यू?
थंडीत रक्तदाब वाढल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे हार्ट आणि ब्रेन अटॅक उद्भवण्याच्या घटना वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. कडाक्याच्या थंडीत स्वत:चा बचाव करणं गरजेचं आहे. थंडीत बाहेर पडताना नाक आणि कान झाकून घ्यावेत, 60 वर्षांवरील वयस्क लोकांनी सकाळचं थंडीत बाहेर पडणं टाळावं, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.