नवी दिल्ली : भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भरभक्कम कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.
अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर या देशांमध्ये मोठा कर लादला जात असल्याबद्दल ट्रम्प यांनी टीका केली. ट्रम्प प्रशासनानं लोखंडाच्या आयातीवर २५ टक्के आणि अॅल्युमिनियमवर १० टक्के कर लावला आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापाराला धक्का बसला असतानाच ट्रम्प यांनी भारत आणि चीनला इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या हर्ले डेव्हिसन या बाईकवर भारतात असलेल्या ५० टक्के आयात शुल्काचं उदाहरण त्यांनी अनेकदा दिलंय. हाच धागा पकडून भारतीय वस्तूंवर कर लादण्यात येईल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय.