UPSC Cancelled Pooja Khedkar Candidature: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर युपीएससीसमोर स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरल्या. पूजा खेडकरला 30 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. पण यामध्ये त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे युपीएससीने मोठा निर्णय घेत पूजा चव्हाणला दोषी ठरवलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 (CSE-2022) ची तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे काढून टाकल्याची माहिती युपीएससीने दिली आहे.
युपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आहेत आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल तिला दोषी आढळले आहे. पूजा चव्हाणलाा भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती युपीएससीने अधिकृतरित्या दिली आहे. पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमी लेयर) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
Union Public Service Commission (UPSC) cancels the provisional candidature of Puja Manorama Dilip Khedkar, a provisionally recommended candidate of the Civil Services Examination-2022 (CSE-2022) and permanently debars her from all future exams and selections: UPSC
— ANI (@ANI) July 31, 2024
पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) सुनावणी सुरू असताना पूजाच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तीवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. पूजाला अटक होण्याचा धोका आहे असं माधवन यांनी कोर्टात सांगितलं. पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय. आता उद्या दुपारी 4 वाजता याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्ट निकाल देणार आहे.
एकीकडे दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर घटस्फोटीत असल्याचं सांगितलं जात असाना दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळीच माहिती समोर आली. 2024 ची लोकसभा निवडणूक दिलीप खेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीकडून लढवली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी असा उल्लेख केला होता. त्यामुळे केंद्र सरकारने या दोघांमध्ये खरंच घटस्फोट झाला होता का? याची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिलेत.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने देखील या प्रकरणात लक्ष घातलं आहे. पंतप्रधान कार्यालयच नाही तर एलबीएसएनएएनेही पूजा यांच्या प्रशिक्षण काळातील अहवाल मागवला आहे. एलबीएसएनएएचे उपसंचालक असलेल्या शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामन्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अङवला मागवला आहे.