इंटरनेटशिवाय UPI द्वारे Online Payment करा, पण कसं ते जाणून घ्या

UPI द्वारे पेमेंट करताना बऱ्याचदा ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

Updated: Sep 7, 2021, 01:53 PM IST
इंटरनेटशिवाय UPI द्वारे Online Payment करा, पण कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : आता देशात सगळेच लोकं डिजीटायजेशनकडे वळले आहेत. ज्यामुळे लोकं आता सर्वत्र ऑनलाईन पेमेंट करतात. मोठ्यातल्या मोठ्या दुकानापासून ते आता छोटी दुकानं आणि अगदी हातगाडीवले सुद्धा आता ऑनलाईन पेमेंट स्वीकारतात. ज्यामुळे आता बहुतेक व्यवहार हे UPI द्वारे पेमेंटद्वारे केले जातात.

परंतु UPI द्वारे पेमेंट करताना बऱ्याचदा ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ज्यामुळे अनेकदा आपल्याकडून पेमेंट होत नाही किंवा समोरच्या व्यक्तीकडे पैसे पोहोचत नाहीत. बऱ्याचदा स्लो इंटरनेटमुळे असं होतं. परंतु काही वेळा दुसऱ्या काही तांत्रिक अडचणी देखील यामागचं कारण असू शकतात.

तुम्हाला तर माहित आहे की, UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज असते, पण तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही आता इंटरनेटशिवायही UPI द्वारे पैसे देऊ शकता? होय, UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी ऑफलाइन मोड देखील उपल्बध आहे. म्हणजे जिथे नेटवर्क नाही किंवा तुमच्याकडे इंटरनेट नाही, तरी देखी तुम्ही ऑफलाइन मोडद्वारे पैसे भरू शकाल.

आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? तर आज आम्ही तुम्हाला हे कसं करावं याबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचं टेन्शन कमी होईल.

ऑफलाइन मोडद्वारे पेमेंट

*99# USSD कोड वापरून UPI ​​पेमेंट ऑफलाइन मोडमध्ये वापरता येते. हा मोड सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी आहे. म्हणजेच ते वापरण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा विशिष्ट फोन असण्याची आवश्यकता नाही.

परंतु, हे लक्षात घ्या की, *99# द्वारे UPI पेमेंट करण्यासाठी, तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

हा एकमेव मार्ग आहे

जरी हे वैशिष्ट्य बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे, परंतु ते इतके लोकप्रिय नाही. कारण प्रत्येक स्मार्टफोन हा इंटरनेटशिवाय वापणं शक्य नाही. त्यामुळे बहुतेक लोकांच्या फोनमध्ये इंटरनेट असल्याने लोकांमध्ये हे वैशिष्ट्य फारचं फेमस नाही. परंतु, *99# USSD हे फीचर फोन यूजर्ससाठी UPI पेमेंटचे एकमेव माध्यम आहे.

इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करा

लक्षात ठेवा की, तुमचा फोन नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असावा.

-आपल्या फोनचा डायलर उघडा आणि *99# ऐंटर केल्यानंतर, कॉल बटणावर टॅप करा.

-यानंतर तुम्हाला अनेक पर्यायांसह मेनू दिसेल. पण, आपल्या फक्त पैसे पाठवाण्यासाठी हा पर्याय वापरायचा असल्याने, फक्त '1' दाबा आणि सेंड करा.

-यानंतर, आपण तो ऑप्शन सिलेक्ट करा, ज्याच्या माध्यमातून तुम्ही रिसीव्हरला पेमेंट करू इच्छिता. उदाहरणार्थ, जर तुम्ही समोरच्याला मोबाईल नंबरवर पैसे ट्रांसफर करत असेल तर तुम्हाला इथे 1 निवडावा लागेल.

-त्यानंतर तुम्हाला त्याव्यक्तीचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, लक्षात ठेवा की, समोरच्या व्यक्तीचा तोच मोबाईनंबर टाका जो त्याच्या बँकेशी किंवा UPIशी कनेक्टेड आहे.

-यानंतर, तेथे रक्कमचा ऑप्शन येईल तेथे रक्कम लिहा आणि Send बटण दाबा.

-यानंतर, पेमेंटबद्दल रिमार्क लिहा.

-त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.

- त्यानंतर आता तुमचा व्यवहार इंटरनेटशिवाय पूर्ण होईल आणि समोरच्या व्यक्तीला पैसे मिळतील

जर तुम्हाला कोणत्या की, एमरजेन्सीमध्ये तुमचा  UPI नंबर बंद करायचा असेल तर, तुम्ही *99#  हा पर्याय वापरुन UPI अक्षम देखील करु शकता.