वाराणसी : उत्तरप्रदेशच्या वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले पोस्टर लागलेले दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी खासदार क्षेत्रातून निवडून आलेत. या पोस्टरवर 'वाराणसीचे खासदार' नरेंद्र मोदी बेपत्ता असल्याचं म्हटलं गेलंय. 'जाने वह कौनसा देश जहाँ तुम चले गए' हे गाणंही मोदींना संबोधित करण्यात आलंय.
पोस्टर छापणाऱ्याच्या नावाचा मात्र यावर उल्लेख नाही. पोस्टरच्या खालच्या भागात मात्र, 'लाचर, असहाय्य आणि निराश काशीवासी' असं म्हटलं गेलंय. मोदींचा पत्ता लागला नाही तर काशीवासींना तक्रार दाखल करावी लागेल, असंही यावर म्हटलं गेलंय.
वाराणसीच्या रस्त्यांवर नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लागल्याचं समजताच स्थानिक प्रशासनाला धक्का बसला. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी हे पोस्टर हटवले.