पतंजलि योगपीठाचे महामंत्री बालकृष्ण एम्स रुग्णालयात

योगगुरु बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांची तब्येत बिघडल्याचे योगपीठातील सुत्रांनी सांगितले. 

Updated: Aug 23, 2019, 06:46 PM IST
पतंजलि योगपीठाचे महामंत्री बालकृष्ण एम्स रुग्णालयात  title=

हरिद्वार : पतंजलि योगपीठाचे महामंत्री आणि पतंजलि आयुर्वेदचे कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांची तब्येत खालावल्याने एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पतंजलि योगपीठाकडून अधिकृतरित्या यावर माहीती देण्यात आली नाही. शुक्रवारी योगगुरु बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांची तब्येत बिघडल्याचे योगपीठातील सुत्रांनी सांगितले. योगपीठातील कार्यालयात ते उपस्थित होते. 

योगपीठातील डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तात्काळ तपासणी केली. पण जास्त वेळ न दवडता त्यांना भूमानंद रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी वेळ न दवडता तात्काळ बालकृष्ण यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.