लखनऊ : उत्तरप्रदेशच्या हापूरच्या पिलखुआ भागात एका घोळक्यानं इसमाची मारहाण करत हत्या केली. इतकंच नाही तर मृतदेहाची विटंबना करत त्यांनी मृतदेहाला जमिनीवर खेचत नेलं... धक्कादायक म्हणजे, हे सर्व घडलं तेव्हा घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते... इतकंच नाही तर या घोळक्यालाच पोलिसांचं संरक्षण मिळत होतं असं समोर आलेल्या फोटोंवरून दिसतंय. हे फोटो सोशल मीडियात वायरल झालेत. या घटनेची संवेदनशील नागरिकांकडून निंदा केली जातेय.
We are Sorry for the Hapur Incident.
Law & order incidents often lead to unintended yet undesirable acts. pic.twitter.com/w5Tsen9UxG— UP POLICE (@Uppolice) June 21, 2018
ही घटना उजेडात आल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी या घटनेवर आपली चूक मान्य करत खेद व्यक्त केलाय. तसंच तीन पोलिसांना निलंबीत करण्यात आलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हाचे हे फोटो आहेत, असा दावा उत्तरप्रदेश पोलिसांनी केलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसाहर, घटनास्थळी अॅम्बुलन्सची सोय नसल्यानं जखमी व्यक्तीला लगेचच रुग्णालयात हलवण्याच प्रयत्न करण्यात आला.
मोटारसायकलच्या धडकेवरून छोटा वाद झाला आणि त्यातच काही ग्रामस्थांनी दोन व्यक्तींना मारहाण करत त्यांना अर्धमेला केला होता.... त्यापैंकी कासिम या इसमाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला... तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.