कसा करणार गुंडांचा सामना! पोलीस जवानाने रायफलमध्ये अशी भरली गोळी, व्हायरल Video पाहून धक्का बसेल

पोलीस होण्यासाठी परीक्षा देऊन कठोर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं, या प्रशिक्षणादरम्यान शारीरिक कसरतीबरोबरच गुन्ह्यांची उकल कशी करावी ते बंदूक चालवण्यार्यंत प्रशिक्षण दिलं जातं. पण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल

Updated: Jan 2, 2023, 01:19 PM IST
कसा करणार गुंडांचा सामना! पोलीस जवानाने रायफलमध्ये अशी भरली गोळी, व्हायरल Video पाहून धक्का बसेल title=

UP Police News: पोलीस दलात भरती (Police Recruitment) होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतर पुढील टप्पा प्रशिक्षणाचा असतो. पोलीस प्रशिक्षण (Police Training) दरम्यान पोलिसांना शारिरीक कवायत, श्रमदान, परेड, पोलीस आणि समाज संबंध, कायद्याची ओळख, पोलीसांची अधिकार तसंच कर्तव्ये इत्यादी संबंधित प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर जवान देशसेवेत रुजू होतो. आपल्या कार्यकाळात पोलीसांना कधीही आणि कोणत्याही आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण एखाद्या पोलिसाला साधी बंदूकीत गोळीही भरता येत नसेल तर. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला. पण ही घटना खरी आहे. 

योगींच्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल
योगींचे पोलीस (UP POlice) गुंडांचा सामना करण्यासाठी किती सक्षम आहेत, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांची तयारी बघून लोकं आश्चर्य व्यक्त करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) संत कबीर नगरमधील आहे.  डीआयजी आर के भारद्वाज (DIG RK Bhardwaj) संत कबीर नगर पोलीस स्टेशनचं निरिक्षण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या पोलीस जवानांना रायफल (Raifal),  टीयर गन सारखी शस्त्र चालवून दाखवण्यास सांगितलं. 

डीआयजींना बसला मोठा धक्का
यावेळी पोलीस जवानाने केलेलं कृत्य पाहून डीआयजी भारद्वाज यांना मोठा धक्का बसला. एका पोलीस जवानाला रायफलमध्ये गोळी कशी भरतात याविषयी विचारण्यात आलं. यावेळी त्या पोलीस जवानाने डीआयजींसमोर गोळी चक्क रायफलच्या पुढच्या नळीतून आत टाकली आणि रायफलचा ट्रिगर दाबला. पण गोळी काही रायफलमधून सुटली नाही. इतकंच काय तर पोलीस स्टेशनच्या इनचार्जला टीअर गन कशी चालवतात याचीच माहिती नव्हती. त्याला सााधी गनही उघडता आली नाही. हे दृष्य पाहून डीआयजी हैराण झाले, या घटनेनंतर त्यांनी जवानांना कठोर प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले.

उत्तर प्रदेशमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे इंग्लीश किंवा सामान्य ज्ञानाचे प्रश्नांवर भंबेरी उडाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असतात. पण ज्या पोलिसांवर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्या पोलिसांनी बंदूकीत गोळी कशी भरावी इतकं ज्ञानही नसल्याचं पाहून योगी सरकारच्या (Yogi Government) पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

pic.twitter.com/W4ujxRyK3R

 

— P N Himanshu (@pn_himanshu) December 28, 2022

आपात परिस्थिती उद्भवू शकतो धोका
यूपी पोलिसांचे जवान आपात परिस्थितीत गुंडांचा सामना करु शकतात की नाही याचा अंदाज घेण्यासाठी डीआयजी भारद्वाज यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनचं निरीक्षण केलं. पण पोलीस विभागातील ज्युनिअर आणि सीनिअर पोलिसांनाही साधासाध्या गोष्टी येत नसल्याचं निदर्शनास आलं. आपात परिस्थितीत पोलीस जवानांच्या जीवावर  बेतू शकतं असं डीआयजी भारद्वाज यांनी म्हटलंय. 

या घटनेनंतर पोलीस जवानांचं योग्य प्रशिक्षण झालं नसल्याचं डीआयजी भारद्वाज यांनी म्हटलं आहे. या पोलीस जवानांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.