Street Dogs Attack : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत चालल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. अनेकदा भटक्या कुत्र्यांकडून चिमुकल्यांना लक्ष्य केलं जातंय. यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. अशातच उत्तर प्रदेशातही एका पाच वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी बळी घेतला आहे. आईला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून नागरिकांकडून कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका ५ वर्षाच्या चिमुरड्यावर रस्त्यावरच्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. आईला शोधण्यासाठी पाच वर्षांचा चिमुकला घराबाहेर पडला होता. मात्र रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी त्याला लक्ष्य केले आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बरेली जिल्ह्यातल्या शेरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आहे. दक्ष असे मृत मुलाचे नाव दक्ष होते. आईला शोधण्यासाठी चिमुकला दक्ष घराबाहेर पडला होता. त्यावेळी त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात दक्ष गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दक्षचे आई-वडील शेरगड येथील शिव मंदिराजवळ राहतात. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी दक्ष घरी खेळत असताना त्याची आई सरोज राठोड चारा गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती. घरात आई नसल्याचे पाहून तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र घराबाहेरील भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच दक्षचा मृत्यू झाला आहे.
18 महिन्यांच्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला
दुसरीकडे, अहमदाबादच्या जुहापुरा भागात एका 18 महिन्यांच्या मुलावर घराबाहेर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुलीला त्याच्या वडिलांनी कुत्र्यापासून वाचवल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चिमुकला घरातून बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी एका कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जमिनीवर पाडलं. त्यावेळी वडिलांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंतते मूल सुमारे दोन ते तीन मिनिटे कुत्र्याच्या तावडीत होते. त्याच्या चेहऱ्याला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे.