Heart Attack : एका खासगी शाळेत नववीतल्या एका विद्यार्थ्यांच्या मृत्यूने (Student Dies) खळबळ उडाली आहे. या मुलाचा हार्टअटॅकने (Heart Attack) मृत्यू झाला. शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार केमिस्ट्रीचा विषय शिकवला जात होता. त्यावेळी हा मुलगा अचानक बेंचवरुन खाली कोळसला. शिक्षक आणि वर्गातील इतर मुलं तात्काळ त्या विद्यार्थ्याजवळ गेले आणि त्याला प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. पण उपाचारापूर्वीच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
कुटुंबियांनी केली चौकशीची मागणी
विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना दिली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. विद्यार्थ्याच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या मृत्यूच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुलाची तब्येत एकदम ठिक होती. त्याला आरोग्यविषयक कोणतीही समस्या नव्हती. पालकांच्या म्हणण्यामुसार दुपारी 12 वाजता शाळेतून फोन आला आणि मुलाची तब्येत ठिक नसल्याचं सांगण्या आलं. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि मुलगा बेशुद्ध झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
हसतखेळत शाळेत गेला.
मृत मुलाच्या वडीलांनी दिलेल्य माहितीनुसार नेहमीप्रमाणे मुलगा हसतखेळत शाळेत गेला. दुपारी बारा वाजता शाळेतील स्टाफचा फोन आला. तुमचा मुलगा वर्गात अचानक कोसळल्याचं सांगण्यात आलं. तसंच आम्ही मुलाला रुग्णालयात घेऊन जात असल्याचंही सांगितलं. पण शाळेने सांगितलेल्या रुग्णालयात जेव्हा आम्ही पोहोचले. तेव्हा तिथे मुलगा किंवा शाळेतलं कोणीही पोहोचलं नव्हतं.. मुलाला एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलं, त्यावेळी त्याचा श्वाच्छोश्वास सुरु होता. पण त्याला दुसऱ्या रुग्णालायत नेण्यास सांगण्यात आलं. दुसऱ्या रुग्णालयात नेण्याआधीच मुलाचा मृत्यू झाल्याचं पालकांनी सांगितलं.
शाळेच्या माहितीत तफावत
मुलाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी पालकांनी केली आहे. क्लाच टीचरने मुलगा मैदानात खेळताना पडल्याचं सांगितलं. तर दुसऱ्या एका शिक्षकाने मुलगा वर्गात शिकत असताना बेंचवरुन कोसळल्याचं सांगितलं. त्यामुळे नेमकं काय घडलं आहे याचा तपास व्हावा अशी मागणी पालकांनी केलीय. मुलाला साधा तापही नव्हता. अभ्यासातही मुलगा हुशार होता. घरचं वातावरण व्यवस्थित होतं, इतकंच काय तर कोणत्याही मित्रासोबत त्याचं भांडण नव्हतं अशी माहितीही मृत मुलाच्या पालकांनी दिली.