उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे भूषण परिस्थिती आहे. रस्ते जलमय झाले आहेत, तर घरात पाणी शिरल्यामुळे असंख्य कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. (up lakhimpur kheri flood brother kept walking for 5 km with sister dead body on shoulders video viral)
गुरुवारी एका कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळलं. दोन भावांची एकुलती एक बहिणीचा टायफॉइडने मृत्यू झालाय. सुमारे आठ दिवसांपूर्वी 15 वर्षीय शिवानीची प्रकृती खालावल्याने तिला खासगी डॉक्टराकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला टायफॉइड झाल्याचे सांगून उपचार सुरू केले. दोन-तीन दिवसांत आराम न मिळाल्याने शिवानीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि तिने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.
आता बहिणीचा मृतदेह घरी कसा यायचा या विवचंनेत होते. काही वाहनातून त्यांनी बहिणीचा मृतदेह अटारिया क्रॉसिंगवर नेला आणि तेथील कल्व्हर्ट कट असल्याने बोटीने पाण्याचा प्रवाह ओलांडून ते रेल्वे रूळावर पोहोचले. यानंतर दोन्ही भावांनी आपल्या बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन वळसा घालून सुमारे पाच किलोमीटरचे अंतर कापून शारदा पुलाजवळ पोहोचले आणि तेथून घराकडे गेले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सपाचे अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, 'पूरपरिस्थितीत आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सरकारने अतिरिक्त व्यवस्था करणे अपेक्षित आहे आणि लक्षात ठेवा की गरिबांच्या जीवालाही मोलाची किंमत आहे.'
उप्र के लखीमपुर से एक दुखद समाचार मिला है कि बाढ़ के कारण सही समय पर अस्पताल न पहुँच पाने से एक लड़की की मृत्यु हो गई। लाचार भाई ने अपनी बहन को कंधे पर लादकर अस्पताल ले जाने का भरसक प्रयास किया लेकिन रास्ते में ही बहन की मौत हो गई।
सरकार से अपेक्षा है कि वो बाढ़ के हालातों में… pic.twitter.com/SX1lGzwntr
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 12, 2024
दरम्यान एसडीएम कार्तिकेय सिंह म्हणाले की, 'सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून या प्रकरणाची माहिती मिळालीय. पीडितेने ना पोलिसांशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधला ना मदत मागितली. मदत मागितली असती तर ती प्रशासकीय पातळीवर नक्कीच दिली असती. पुरामुळे रस्ते बंद झाल्याने अशी अस्वस्थ परिस्थिती निर्माण झालीय.'